तरुणीची छेड काढणारे अटकेत, घटनेदरम्यानच ठाणे पोलिसांची तत्काळ मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 03:28 AM2018-02-26T03:28:15+5:302018-02-26T04:18:03+5:30

पाळीव श्वानाला घराजवळच्या परिसरात फिरविणा-या एका २३ वर्षीय तरुणीची, किसननगर शिवाजीनगर भागात छेड काढणा-या चौघांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली. तिची छेड काढली जात असतानाच, तिने ठाणे शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिलेल्या माहितीवरून, अवघ्या काही मिनिटांमध्येच पोलिसांनी ही कारवाई केली.

 During the incident, the Thane police's immediate help | तरुणीची छेड काढणारे अटकेत, घटनेदरम्यानच ठाणे पोलिसांची तत्काळ मदत

तरुणीची छेड काढणारे अटकेत, घटनेदरम्यानच ठाणे पोलिसांची तत्काळ मदत

Next

ठाणे : पाळीव श्वानाला घराजवळच्या परिसरात फिरविणा-या एका २३ वर्षीय तरुणीची, किसननगर शिवाजीनगर भागात छेड काढणा-या चौघांपैकी दोघांना श्रीनगर पोलिसांनी अटक केली. तिची छेड काढली जात असतानाच, तिने ठाणे शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिलेल्या माहितीवरून, अवघ्या काही मिनिटांमध्येच पोलिसांनी ही कारवाई केली.
अरबाज नियाज खान (१८, रा. कादरी मंजील, पडवळनगर, वागळे इस्टेट, ठाणे) याच्यासह अन्य एका १७ वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अरबाजसह चौघे जण शिवाजीनगर भाजी मार्केट ठाणे महापालिका शाळेकडे जाणा-या रस्त्यावर, या इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करणाºया तरुणीची सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास छेड काढली. आधी तिच्या कुत्र्याचे नाव विचारण्याचा बहाणा करीत तिचेही त्यांनी वारंवार नाव विचारले. नंतर तिच्यावर अश्लील शेरेबाजी करीत, तिला गराडा घालून चौघांनीही तिला पुढे मागे जाण्यास मज्जाव केला. त्याच वेळी तेथून जाणाºया एका मित्रालाही तिने हा प्रकार सांगितला. ती त्याच्या मदतीने पुढे जाऊ लागल्यानंतरही, त्यांनी तिचा पाठलाग करीत पुन्हा छेड काढणे सुरूच ठेवले. तिने अखेर ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाच्या १०० या क्रमांकावर संपर्क साधून या प्रकाराची तक्रार केली. त्यानंतर, श्रीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पंधारकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिनेश चव्हाण, पोलीस नाईक आर. आर. गार्डे, टी. टी. पोटेकर, कॉन्स्टेबल ए. बी. बावणे आणि वाय. सी. राठोड आदींच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन छेड काढणाºया चौकडीपैकी दोघांची धरपकड केली.
पोलिसांची व्हॅन पाहून त्यातील उर्वरित दोघांनी मात्र पलायन केले. दरम्यान, अरबाज याची ठाणे न्यायालयाने १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर रविवारी सुटका केली, तर त्याचा साथीदार अल्पवयीन असल्यामुळे त्याला सोमवारी भिवंडीच्या बाल न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title:  During the incident, the Thane police's immediate help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.