नवरात्रीत गरब्याला ३ दिवस रात्री १२ पर्यंत परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 06:40 AM2022-09-28T06:40:02+5:302022-09-28T06:41:40+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेनंतर घेतला निर्णय.

During Navratri Garbya is allowed till 12 midnight for 3 days cm eknath shinde devendra fadnavis | नवरात्रीत गरब्याला ३ दिवस रात्री १२ पर्यंत परवानगी

नवरात्रीत गरब्याला ३ दिवस रात्री १२ पर्यंत परवानगी

Next

मुंबई : यंदा नवरात्रोत्सवात १ ऑक्टोबर या दिवशीही उत्सवासाठी रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास सूट देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेनंतर हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तीन दिवस रात्री १२पर्यंत गरबा खेळता येईल.

पर्यावरण व वातावरणीय बदल सुधारित नियम, २०१७ अन्वये वर्षामध्ये १५ दिवस निश्चित करुन सकाळी ६ पासून रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास सूट जाहीर करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून १३ दिवस निश्चित करण्यात येतात. तसेच, २ दिवस हे जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीनुसार सूट देण्यासाठी राखीव ठेवण्यात येतात.

यावर्षी १ ऑक्टोबर, २०२२ रोजी नवरात्रोत्सवासाठी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास सूट देण्यात आली आहे. त्यामुळे सोमवार, ३ ऑक्टोबर आणि मंगळवार, ४ ऑक्टोबर याव्यतिरिक्त शनिवार, १ ऑक्टोबर हा एक वाढीव दिवस उपलब्ध होईल.

Web Title: During Navratri Garbya is allowed till 12 midnight for 3 days cm eknath shinde devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.