रात्री उशिरापर्यत दाखल झालीत मतदान पथके

By admin | Published: February 22, 2017 02:00 PM2017-02-22T14:00:15+5:302017-02-22T14:00:15+5:30

अमरावती : जिल्हा परिषदेच्या ५९ गटासाठी तर १० पंचायत समितीच्या ८८ गणांसाठी सोमवारी सकाळी ७.३० ते ५.३० वाजेपर्यत मतदान घेण्यात आले.

During the night, the polling booths went on | रात्री उशिरापर्यत दाखल झालीत मतदान पथके

रात्री उशिरापर्यत दाखल झालीत मतदान पथके

Next

रात्री उशिरापर्यत दाखल झालीत मतदान पथके
अमरावती : जिल्हा परिषदेच्या ५९ गटासाठी तर १० पंचायत समितीच्या ८८ गणांसाठी सोमवारी सकाळी ७.३० ते ५.३० वाजेपर्यत मतदान घेण्यात आले. आयोगाने ठरवून दिलेल्या वेळेत १०१ मतदान केंदावर मतदारांच्या रांगा मतदान केंद्र परिसरात लागल्या होत्या त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जिल्हाभरातील १ हजार ७८७ पथके इव्हिएम मशीन व साहित्य घेऊन मतमोजणीच्या ठिकाणी पोहोचतील.
जिल्हा परिषदेचे ५९ गट व पंचायत समितीच्या ८८ गणांसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यासाठी जिल्ह्यात एक हजार ७८७ मतदान केंद्र होते. साधारणत: ११ हजार अधिकारी, कर्मचारी व तीन हजारांवर पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर मतदान प्रक्रियेची धुरा सांभाळली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात १३ लाख ९० हजार ८९६ मतदार होते. यामध्ये ७ लाख २५ हजार ६९ पुरूष व ६ लाख ६५ हजार २६७ महिलांसह २० इतर मतदारांचा समावेश आहे. मात्र किती मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला यांची आकडेवारी रात्री उशिरापर्यत समजू शकली नाही. मतदानासाठी तीन हजार ४६० मतदान यंत्राचा वापर करण्यात आले. २१ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रियेनंतर मतदान पथकांची १४ तालुक्यातील मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी साहित्य पोहचविण्यासाठी रात्री साधारणपणे १२ वाजेपर्यत लगबग सुरू होती.

Web Title: During the night, the polling booths went on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.