निधीअभावी तिरंदाज विशालचे स्वप्न धुळीस!
By admin | Published: August 3, 2016 02:50 AM2016-08-03T02:50:54+5:302016-08-03T02:50:54+5:30
आॅलिम्पिकच्या तयारीसाठी लाखो रुपये खेळाडूंवर खर्च होत आहेत.
रोहा : आॅलिम्पिकच्या तयारीसाठी लाखो रुपये खेळाडूंवर खर्च होत आहेत. क्रिकेटसारख्या खेळात कोट्यवधी खर्च केले जात आहेत. प्रो कबड्डीमुळे पटूंनादेखील चांगले दिवस येत आहेत. परंतु अनादी काळापासून धनुर्विद्या आपल्या देशात शिकवली जात आहे. अनेक तरुणांनी यात कौशल्य देखील प्राप्त केले आहे. मात्र निधीअभावी त्यांच्या वाटेला निराशाच येत आहे.
रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील धाटाव गावातील तिरंदाजपटू धनुर्धर विशाल श्रीराम कदम याची २४ ते ३० सप्टेंबर २०१६ या कालावधीत आॅस्ट्रेलिया येथील स्पर्धेस जाण्यासाठी आवश्यक निधी जमा करता आला नाही तर यामुळे जागतिक पातळीवर तिरंदाजी या प्रकारात देशाचे नाव, रायगडचे नाव उंचविण्याचे विशाल कदम याचे स्वप्न धुळीस मिळणार अशी चिन्हे दिसून येत आहेत.
घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना देखील तालुका, राज्य व राष्ट्रीय पातळीवर विशालने सर्वोत्तम कामगिरी करत राष्ट्रीय पातळीवर २ सिल्व्हर व १ ब्रॉन्झ, राज्य पातळीवर १ गोल्ड व ब्राँझ पदकाची कमाई केली आहे. जागतिक मैदानी तिरंदाजी स्पर्धेसाठी पात्र ठरणारा विशाल कदम हा रायगड जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू आहे. या स्पर्धेची प्रवेश फी, व्हिसा व विमान प्रवासाचे तिकीट, राहण्याच्या व्यवस्थेसह इतर खर्च धरुन विशाल कदम याला ३ लाख ७० हजार रुपयांची आवश्यकता आहे. धनुर्विद्येसारख्या प्राचीन खेळात नैपुण्य प्राप्त केलेल्या या खेळाडूसाठी दाता मिळत नसल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)
स्पर्धेसाठी पात्र घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना देखील तालुका, राज्य व राष्ट्रीय पातळीवर विशालने सर्वोत्तम कामगिरी करत राष्ट्रीय पातळीवर २ सिल्व्हर व १ ब्रॉन्झ, राज्य पातळीवर १ गोल्ड व ब्रॉन्झ पदकाची कमाई केली आहे. जागतिक मैदानी तिरंदाजी स्पर्धेसाठी पात्र ठरणारा विशाल जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू आहे. त्याला या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३ लाख ७० हजारांची आवश्यकता आहे.