शुल्क नियंत्रण कायदा लवकरच!
By Admin | Published: March 9, 2015 01:49 AM2015-03-09T01:49:35+5:302015-03-09T01:49:35+5:30
ज्ञानदानासारखे पवित्र कार्य शिक्षणसम्राटांच्या हातात गेल्याने अवास्तव शुल्क आकारणी सुरू झाल्याच्या तक्रारी येत आहेत
नाशिक : ज्ञानदानासारखे पवित्र कार्य शिक्षणसम्राटांच्या हातात गेल्याने अवास्तव शुल्क आकारणी सुरू झाल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी लवकरच शुल्क नियंत्रण कायदा (फी रेग्युलेशन अॅक्ट) लागू करणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी येथे केली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ‘डिपेक्स २०१५’ प्रदर्शनात बोलताना तावडे म्हणाले, यापुढे शिक्षणाची जबाबदारी शिक्षणसम्राटांकडे न देता ती शिक्षणतज्ज्ञांकडे देण्यास प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल. सीईटीची परीक्षा दहावी-बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.
संशोधन हे केवळ पगारवाढीसाठीच केले जाते. त्यामुळे देशाला काय फायदा आहे, याकडे बघितले जात नाही. आता प्रत्येक संशोधनातून देशाला फायदा होण्यासाठी इनोव्हेशन कौंसिल स्थापन करून त्याद्वारे संशोधन पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यासाठी आर्थिक तरतूद वाढवणार आहे. ‘आरटीई’च्या कायद्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे त्यानंी सांगितले.