ह्रदयद्रावक! कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टरचा रुग्णवाहिकेतच मृत्यू; नेमकं घडलं काय?

By अनिल गवई | Published: August 21, 2022 05:25 PM2022-08-21T17:25:15+5:302022-08-21T17:27:12+5:30

कर्तव्यावरील डॉक्टरचा रूग्णवाहिकेतच मृत्यू, रोहणा येथील घटना: डॉक्टरचा मृतदेह स्वीकारण्यास कुटूंबियांचा नकार

Duty doctor dies in ambulance in Buldhana Khamgaon; What really happened? | ह्रदयद्रावक! कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टरचा रुग्णवाहिकेतच मृत्यू; नेमकं घडलं काय?

ह्रदयद्रावक! कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टरचा रुग्णवाहिकेतच मृत्यू; नेमकं घडलं काय?

googlenewsNext

अनिल गवई 

खामगाव -  बुलढाणा जिल्ह्यातील रोहणा प्राथमिक आरोग्य केंद्रात आकस्मित सेवेसाठी असलेली १०८ रुग्णवाहिकेवरील कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर ओमप्रकाश सूर्यवंशी यांचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला आहे. मध्यरात्री एका गंभीर रुग्णाला घेण्यासाठी जात असताना धावत्या रुग्णवाहिकेत डॉक्टराचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. मध्यरात्री डॉ. सूर्यवंशी यांना एका रुग्णाचा फोन आल्याने ते रुग्णवाहिका चालक यांना घेऊन रुग्णाच्या घरी जात असताना अचानक धावत्या रुग्णवाहिकेत त्यांची तब्येत अचानक बिघडली तात्काळ रुग्णवाहिका चालकाने प्रसंगावधान ठेऊन त्यांना खामगाव सामान्य रुग्णालयात आणले पण तोपर्यंत डॉ.सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. 

ही माहिती सदर रुग्णवाहिका संचालन करणाऱ्या भारत विकास ग्रुपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली पण १२ तास उलटून गेल्यावरही संबंधित कंपनीचे जिल्ह्याचे प्रबंधक अजिंक्य लवंगे यांनी अजूनही याठिकाणी भेट न दिल्याने डॉ.ओमप्रकाश सूर्यवंशी यांचे नातेवाईक व 108 रुग्णवाहिकेचे चालक व डॉक्टर्स यांनी संताप व्यक्त केला. जो पर्यंत भारत विकास ग्रुप कंपनीचे अधिकारी या ठिकाणी येणार नाहीत तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. भारत विकास ग्रुप कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱयांच्या तणावाला डॉ सूर्यवंशी बळी पडल्याचा आरोप यावेळी कर्मचारी करत आहे. अजूनही मृतदेह सामान्य रुग्णालयात पडून आहे.

सामान्य रूग्णालयात तणावाचे वातावरण
कर्तव्यावरच डॉ. सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला सामान्य रूग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली असून, नातेवाईकांनी अतिरिक्त ताणामुळे डॉ. सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. त्यांचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे सामान्य रूग्णालयात रविवारी काही काळ तणाव निर्माण झाला.

रूग्णवाहिकेत कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांचा रविवारी पहाटे मृत्यू झाला. सामान्य रूग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. - डॉ. निलेश टापरे, वैद्यकीय अधिक्षक सामान्य रूग्णालय, खामगाव.
 

Web Title: Duty doctor dies in ambulance in Buldhana Khamgaon; What really happened?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर