झाडाच्या फांदीत अडकून बिबट्याचा मृत्यू

By admin | Published: May 11, 2014 07:47 PM2014-05-11T19:47:33+5:302014-05-12T03:59:27+5:30

माकडाची शिकार करताना माकडांप्रमाणेच झाडावरून जमिनीवर तर जमिनीवरून झाडावर उड्या मारताना झाडाच्या दोन फांद्यांमध्ये अडकून बिबट्याचा अपघाती मृत्यू झाला.

Dying of a straw hat in a tree | झाडाच्या फांदीत अडकून बिबट्याचा मृत्यू

झाडाच्या फांदीत अडकून बिबट्याचा मृत्यू

Next

झाडाच्या फांदीत अडकून बिबट्याचा मृत्यू
माकडचेष्टेमुळे गेले प्राण : मेळघाटच्या हरिसाल जंगलातील घटना
अचलपूर : माकडाची शिकार करताना माकडांप्रमाणेच झाडावरून जमिनीवर तर जमिनीवरून झाडावर उड्या मारताना झाडाच्या दोन फांद्यांमध्ये अडकून बिबट्याचा अपघाती मृत्यू झाला. गुगामल वन्यजीव विभागाच्या हरिसाल परिक्षेत्रातील जंगलात शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता ही घटना उघडकीस आली.
गुगामल वन्यजीव विभागाच्या हरिसाल परिक्षेत्रातील वनखंड क्रमांक ६३७-शेरीकुंडी परिसरात हरिसाल येथील रहिवासी गणेश शनवारे हिरव्या मांडवासाठी झाडांच्या फांद्या आणायला गेले असता त्यांच्या ही बाब निदर्शनास आली. जांभुळच्या झाडावर दोन फांद्यांमध्ये बिबट मृतावस्थेत अडकलेला आढळला. ही माहिती शनवारे यांनी महिला वन कर्मचारी कोथलकर यांना दिली. मृत बिबटाचे वय साडेतीन वर्षे होते. वन नियमानुसार मृत बिबट्याला जाळण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)

शिकार्‍याची झाली शिकार
बिबट चतुरस्त्र प्राणी असून मोठ्या शिताफीने शिकारीला पंज्यात पकडण्याचे कौशल्य असते. त्यामुळेच उंच उडी घेत शिकार करण्याच्या नादात झाडाच्या फांद्यांमध्ये अडकून बिबटाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनसूत्रांनी वर्तविला आहे. माकडाची शिकार करताना माकडाप्रमाणेे उड्या मारताना बिबटाला प्राण गमवावे लागले.

Web Title: Dying of a straw hat in a tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.