राज्याच्या राजकारणात घराणेशाहीचेच वर्चस्व
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 04:04 AM2019-09-22T04:04:29+5:302019-09-22T06:39:04+5:30
‘पार्टी विथ डिफरन्स’चा दावा करणाऱ्या भाजपपासून सर्वच पक्षांमध्ये सारखी स्थिती
कोल्हापूर : संयुक्तमहाराष्ट्राची स्थापना होऊन आज ५९ वर्षे लोटली असली तरी या सहा दशकांच्या कालावधीत राज्याचे राजकारण काही ठरावीक घराण्यांच्याच केंद्रस्थानी राहिले आहे. खरेतर, प्रवरानगरच्या विखे-पाटील घराण्यापासूनच राज्यातील राजकीय घराणेशाहीचा आरंभ झाला असे मानले जाते. मात्र, आजघडीला महाराष्ट्राच्या राजकारणात घराणेशाही नसलेला पक्ष शोधूनही सापडणार नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळेच सत्ता कोणाचीही असो, राज्याचे राजकारण पवार, मुंडे, विखे, चव्हाण या नावांच्या पलीकडे कधी गेलेच नाही.
एकाने खुर्ची खाली केली की लगेच त्याच खुर्चीवर वारसाहक्क सांगितला जाऊ लागल्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला ५९ वर्षांच्या कार्यकाळात नवे चेहरे मिळू शकले नाहीत. अर्थात, याला आर. आर. पाटील यांच्यासारखे काही अपवाद ठरले असले तरी घराणेशाहीची झूल आम्ही पांघरत नाही म्हणणारी शिवसेना असो की पार्टी विथ डिफरन्सचा नारा देणारी भाजप असो, या सर्वच पक्षांनी पुढे जाऊन आपापल्या पक्षात घराणेशाही नकळतपणे रुजवली. त्यामुळे राज्याच्या स्थापनेपासूनचे पहिले दशक सोडल्यास या घराणेशाहीच्या छटा राजकारणात स्पष्टपणे उमटल्यात.
- बाळासाहेब विखे-पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, सुजय विखे-पाटील
- वसंतदादा पाटील, प्रकाश पाटील, प्रतीक पाटील
- वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, मनोहर नाईक
- शरद पवार, अजित पवार, रोहित पवार
- बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे
- गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे
- बाळासाहेब देसाई, शंभूराजे देसाई
- अभयसिंहराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले
- राजारामबापू पाटील, जयंत पाटील
- केशरकाकू क्षीरसागर, जयदत्त क्षीरसागर
- शंकरराव मोहिते-पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील
- शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण, अमिता चव्हाण
- विलासराव देशमुख, अमित देशमुख
- छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ
- नारायण राणे, नीतेश राणे
- भाऊसाहेब थोरात, बाळासाहेब थोरात
- प्रेमलाताई चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण
- कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश आवाडे, राहुल आवाडे
- तात्यासाहेब कोरे, विनय कोरे
- मुरली देवरा, मिलिंद देवरा
- सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे
- एकनाथ गायकवाड, वर्षा गायकवाड
- दत्ता पाटील, जयंत पाटील
- पद्मसिंह पाटील, राणा जगजितसिंह पाटील
- शंकरराव पाटील, हर्षवर्धन पाटील, अंकिता पाटील
- दत्ता मेघे, सागर मेघे
- दत्तात्रय वळसे-पाटील, दिलीप वळसे-पाटील
- सुभाष कुल, रंजना कुल, राहुल कुल
- वसंत डावखरे, निरंजन डावखरे
- सुनील तटकरे, अनिकेत तटकरे
- विजयकुमार गावित, हिना गावित
- रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर
- पुंडलिक गवळी, भावना गवळी