डीवायएसपींनाही गुन्हेगारांना तडीपार करण्याचे अधिकार देणार

By admin | Published: July 3, 2015 03:10 AM2015-07-03T03:10:36+5:302015-07-03T03:10:36+5:30

आयुक्तालयाप्रमाणेच ग्रामीण भागातील डीवायएसपींनाही गुन्हेगारांना तडीपार करण्याचे अधिकार देण्याचा विचार सुरू आहे. मंत्रिमंडळात त्याबाबतचा आवश्यक तो निर्णय घेण्याची

DySPs also have the right to crack down on criminals | डीवायएसपींनाही गुन्हेगारांना तडीपार करण्याचे अधिकार देणार

डीवायएसपींनाही गुन्हेगारांना तडीपार करण्याचे अधिकार देणार

Next

नागपूर : आयुक्तालयाप्रमाणेच ग्रामीण भागातील डीवायएसपींनाही गुन्हेगारांना तडीपार करण्याचे अधिकार देण्याचा विचार सुरू आहे. मंत्रिमंडळात त्याबाबतचा आवश्यक तो निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.
शहरी भागात (आयुक्तालयात) गुन्हेगारांना तडीपार करण्याचे अधिकार डीसीपींना आहेत. त्यामुळे ते तातडीने गुन्हेगारांचा अहवाल तयार करून त्यांना तडीपार करू शकतात. ग्रामीण भागात डीवायएसपी गुन्हेगारांचा अहवाल तयार करून त्याच्या तडीपारीसाठी महसूल अधिकाऱ्यांकडे परवानगी मागतात. मात्र, ही फाईल संबंधित अधिकाऱ्यांकडे महिनोंमहिने मंजुरीसाठी पडून असते. त्यामुळे डीवायएसपी, एसपींनाच गुन्हेगारांच्या हद्दपारीचे अधिकार देण्याचा विचार पुढे आला आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

अंनिसचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पोलीस अद्याप शोधू का शकले नाहीत, या प्रश्नावर शिंदे यांनी गोलमोल उत्तर दिले. तसेच गडचिरोलीतील पोलीस अधिकाऱ्यांची रिक्त पदे लवकरच भरली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली़

Web Title: DySPs also have the right to crack down on criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.