बँक व्यवहारात ई-मेल आयडी बंधनकारक नाही : उच्च न्यायालय  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 03:51 AM2017-08-10T03:51:21+5:302017-08-10T03:51:28+5:30

बँक व्यवहारामध्ये ई-मेल आयडी देणे बंधनकारक नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला. त्यामुळे ई-मेल आयडी नसणाºया असंख्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

E-mail ID is not mandatory in bank transaction: High Court | बँक व्यवहारात ई-मेल आयडी बंधनकारक नाही : उच्च न्यायालय  

बँक व्यवहारात ई-मेल आयडी बंधनकारक नाही : उच्च न्यायालय  

Next

नागपूर : बँक व्यवहारामध्ये ई-मेल आयडी देणे बंधनकारक नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला. त्यामुळे ई-मेल आयडी नसणाºया असंख्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
प्रकरणावर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांच्यासमक्ष सुनावणी झाली. युको बँकेने ई-मेल आयडी मागितल्यामुळे सीताबर्डी येथील वयोवृद्ध दाम्पत्य प्रभाकर व प्रमिला किन्हेकर यांनी न्यायालयाला पत्र लिहिले होते. न्यायालयाने त्या पत्राची जनहित याचिका म्हणून दखल घेऊन कामकाज पाहण्यासाठी अ‍ॅड. अनिल किलोर यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केली होती. अ‍ॅड. किलोर यांनी विविध बाबींकडे न्यायालयाचे लक्ष वेधून बँक व्यवहारामध्ये ई-मेल आयडी देणे बंधनकारक करता येणार नसल्याचे सांगितले.
किन्हेकर दाम्पत्याचे युको बँकेत बचत खाते आहे तसेच त्यांनी काही रकमेची मुदतठेव ठेवली आहे. त्यांचे एकूण उत्पन्न करपात्र नाही. त्यामुळे त्यांनी बँकेला १५एच अर्ज भरून दिला होता; परंतु बँक अधिकाºयाने अर्जात ई-मेल आयडी नोंदविण्यास सांगितले. ई-मेल आयडी नसल्यास अर्ज अपूर्ण समजून मुदतठेवीवरील व्याजावर टीडीएस कपात करण्यात येईल, अशी तंबी त्यांना देण्यात आली. त्यामुळे हे दाम्पत्य अडचणीत सापडले होते. ई-मेल आयडी काय प्रकार आहे, हे त्यांना माहीत नव्हते. परिणामी त्यांनी न्यायालयाला पत्र लिहून स्वत:ची व्यथा व्यक्त केली होती.

किन्हेकर दाम्पत्याचे युको बँकेत बचत खाते आहे तसेच त्यांनी काही रकमेची मुदतठेव ठेवली आहे. त्यांचे एकूण उत्पन्न करपात्र नाही. त्यामुळे त्यांनी बँकेला १५एच अर्ज भरून दिला होता; परंतु बँक अधिकाºयाने अर्जात ई-मेल आयडी नोंदविण्यास सांगितले. ई-मेल आयडी नसल्यास अर्ज अपूर्ण समजून मुदतठेवीवरील व्याजावर टीडीएस कपात करण्यात येईल, अशी तंबी त्यांना देण्यात आली.
 

Web Title: E-mail ID is not mandatory in bank transaction: High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.