वीजग्राहकांना ई-पेमेंटची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2016 04:24 AM2016-12-22T04:24:16+5:302016-12-22T04:24:16+5:30
पाचशे आणि हजारच्या नोटा व्यवहारातून बाद झाल्यानंतर, बाजारपेठेत सुट्या पैशांची चणचण जाणवू लागली. यावर
Next
मुंबई : पाचशे आणि हजारच्या नोटा व्यवहारातून बाद झाल्यानंतर, बाजारपेठेत सुट्या पैशांची चणचण जाणवू लागली.
यावर शक्कल म्हणून कार्डसह इतर सुविधांचा पाऊस पडू लागला असतानाच, रिलायन्स एनर्जीने आपल्या वीजग्राहकांसाठी ई-पेमेंट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रिलायन्सच्या संकेतस्थळासह अॅपवर ही सुविधा उपलब्ध असून, आॅनलाइन बिल भरण्यासाठी वीजग्राहकांना आणखी एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. (प्रतिनिधी)