एसटीच्या बसेसवर ई-टॅग प्रणाली बसविणार

By admin | Published: January 24, 2017 04:28 AM2017-01-24T04:28:12+5:302017-01-24T04:28:12+5:30

टोल नाक्यांवर टोल भरण्यासाठी एसटी बसेसना लागणारा वेळ, त्यामुळे प्रवाशांनाही इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी लागणारा ले

The e-tag system will be installed on ST buses | एसटीच्या बसेसवर ई-टॅग प्रणाली बसविणार

एसटीच्या बसेसवर ई-टॅग प्रणाली बसविणार

Next

मुंबई : टोल नाक्यांवर टोल भरण्यासाठी एसटी बसेसना लागणारा वेळ, त्यामुळे प्रवाशांनाही इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी लागणारा लेटमार्क आणि टोलचा आर्थिक ताळेबंद ठेवताना होत असलेला गोंधळ, या सर्वातून एसटी महामंडळाची लवकरच सुटका होईल. एसटीच्या बसेसवर ई-टॅग प्रणाली बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या प्रणालीद्वारे टोलची रक्कम थेट बँकेतूनच अदा केली जाईल. महत्त्वाची बाब म्हणजे, यामुळे १0 टक्के सूट टोलमधून एसटी बसेसना मिळेल.
एसटीचा राज्यात मोठा पसारा आहे. जिल्हा मार्ग, राज्य मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांवरून एसटी बसेस जाताना, त्यांना या मार्गावरील टोल नाक्यांवर टोल भरावा लागतो. यात सध्या राष्ट्रीय महामार्गांव्यतिरिक्त अन्य टोल नाक्यांतून एसटीच्या बसेसना सूट देण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्र्गावरील जवळपास ४३ टोल नाक्यांतून एसटीच्या ३,५00 हून अधिक बसेस जातात. तर काही महापालिका क्षेत्रातील टोल नाक्यांमधून एसटी जात असून, वर्षाकाठी १३५ कोटी रुपये टोल महामंडळ भरत आहे. मुळात टोल भरताना एसटी बसेसचा वेळ जातो. त्यामुळे प्रवाशांनाही त्याचा मनस्ताप होतो. वाहक टोलची पावती गहाळ झाल्यास वाहकावरच ‘बिल’फाडले जाते. त्याचप्रमाणे, टोलचा ताळेबंद ठेवतानाही एसटीच्या नाकेनऊ येतात. या सर्व कटकटीतून बाहेर पडण्यासाठी एसटी बसेसवर ‘ई-टॅग’बसवण्याचा निर्णय घेतला. (प्रतिनिधी)

Web Title: The e-tag system will be installed on ST buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.