ई-तिकीट संकेतस्थळ पूर्णपणे सुरक्षित

By Admin | Published: July 18, 2016 03:05 AM2016-07-18T03:05:35+5:302016-07-18T03:05:35+5:30

रेल्वेच्या ई-तिकीट आरक्षणासाठी आयआरसीटीसीचे संकेतस्थळ सुरक्षितच आहे, असा दावा आयआरसीटीसीचे अधिकारी करत आहेत.

E-ticket website completely safe | ई-तिकीट संकेतस्थळ पूर्णपणे सुरक्षित

ई-तिकीट संकेतस्थळ पूर्णपणे सुरक्षित

googlenewsNext


मुंबई : रेल्वेच्या ई-तिकीट आरक्षणासाठी आयआरसीटीसीचे संकेतस्थळ सुरक्षितच आहे, असा दावा आयआरसीटीसीचे अधिकारी करत आहेत. मात्र तिकीट आरक्षण प्रक्रिया जलद गतीने पार करण्यासाठी सॉफ्टवेअरचा आधार घेतला जात असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाच्या पश्चिम विभागाचे महानिरीक्षक उदय शुक्ला यांनी सांगितले. यावर उपाय म्हणून आयआरसीटीसीशी पत्रव्यवहार झाला असून, आयआरसीटीसीने यावर उपाय करावा, असेही शुक्ला यांनी स्पष्ट केले आहे.
पश्चिम रेल्वेवर गेल्या सहा महिन्यांत ३१८ तिकीट दलालांवर कारवाई करण्यात आली आहे. यापैकी १०८ प्रकरणांमध्ये ११३ जणांनाबेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
> प्रक्रिया जलद
उदय शुक्ला यांच्या पत्रव्यवहाराच्या संबंधी आयआरसीटीसी मुंबई विभागाचे प्रमुख अरविंद मालखेडे यांना विचारले असता ते म्हणाले, तिकीट आरक्षणाची प्रक्रिया जलद करणाऱ्या सॉफ्टवेअरची माहिती आयआरसीटीसीकडे आहे. त्यामुळे ते सॉफ्टवेअर निकामी करण्यासाठी सलग दोन तिकिटांच्या आरक्षणाकरिता कमीत कमी ३५ सेकंदांचा वेळ जाणे आवश्यक आहे.

Web Title: E-ticket website completely safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.