दळणवळणाचा ई ट्रॅक
By Admin | Published: February 27, 2015 02:44 AM2015-02-27T02:44:06+5:302015-02-27T02:44:06+5:30
अनारक्षित तिकिटावर प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना पाच मिनिटांत तिकीट खरेदी करणे शक्य व्हावे यासाठी रेल्वेचे ‘आॅपरेशन फाइव्ह मिनिट्स’.
> प्रत्येकाला पाच मिनिटांत तिकीट
अनारक्षित तिकिटावर प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना पाच मिनिटांत तिकीट खरेदी करणे शक्य व्हावे यासाठी रेल्वेचे ‘आॅपरेशन फाइव्ह मिनिट्स’.
यासाठी सुधारित ‘हॉट बटण’, नाणी टाकून तिकिटे घेण्याची यंत्रे आणि ‘सिंगल डेस्टिनेशन टेलर’ खिडक्यांमुळे तिकिटांची संख्या अनेक पटींनी वाढविणार.
अपंगांना सवलतीची ई-तिकिटे एकदाच नोंदणी करून विकत घेणे शक्य व्हावे यासाठी खास व्यवस्था.
बहुभाषिक ई-टिकेटिंग पोर्टल विकसित करण्याची योजना.
अंतिमत: तिकिटांच्या परताव्याची सर्व प्रकारची रक्कम प्रवाशांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याची व्यवस्था करण्याच्या दिशेने प्रयत्न.
रेल्वेगाड्यांमधून प्रवास करीत असताना प्रवाशांना येणाऱ्या अडचणींचे त्याचवेळी निराकरण करण्यासाठी संपूर्ण देशासाठी सामायिक असा ‘१३८’ हा हेल्पलाइन नंबर रेल्वे कार्यान्वित करणार आहे. प्रवास करतानाही यावर तक्रार करता येईल. प्रवाशांच्या रेल्वेशी निगडित तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक मोबाइल अॅपही विकसित केले जात आहे. ही सेवा पथदर्शी स्वरूपात रविवार, १ मार्चपासून सुरुवातीस उत्तर रेल्वेवर सुरू केली जाईल. यातून येणारा अनुभव व प्रवाशांच्या प्रतिक्रिया पाहून देशभर अंमलबजावणी केली जाईल. प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयीच्या तक्रारींसाठी ‘१८२’ हा टोल-फ्री नंबर स्वतंत्रपणे सुरू केला आहे.