प्रत्येक व्यंगचित्र सांगते, एक संपूर्ण कहाणी
By Admin | Published: May 5, 2016 10:32 PM2016-05-05T22:32:29+5:302016-05-05T22:32:29+5:30
‘वर्ल्ड कार्टूनिस्ट डे’ निमित्त देशभरातील प्रसिद्ध व्यंगचित्रकारांच्या बहुचर्चित व्यंगचित्रांचा समावेश असलेली व्यंगचित्र प्रकाशित करण्यात आली आहेत
लोकमत वृत्तपत्र समूहाने ‘वर्ल्ड कार्टूनिस्ट डे’ निमित्त मोठे विधायक पाऊल उचलले आहे. याअंतर्गत ‘वर्ल्ड कार्टूनिस्ट डे’ निमित्त देशभरातील प्रसिद्ध व्यंगचित्रकारांच्या बहुचर्चित व्यंगचित्रांचा समावेश असलेली व्यंगचित्र प्रकाशित करण्यात आली आहेत. याशिवाय लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी, नागपूर येथे ४ मे रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपराजधानीतील प्रसिद्ध व्यंगचित्रकारांनी केवळ आपली व्यंगचित्रे प्रदर्शितच केली नाही तर व्यंगचित्र बनविण्याच्या कलेशी लोकांना अवगतही केले. लोकमत वृत्तपत्र समूहाने व्यावसायिक आणि बिगर-व्यावसायिक व्यंगचित्रकारांसाठी व्यंगचित्र स्पर्धादेखील आयोजित केली. या स्पर्धेला संपूर्ण देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. त्यात बीबीसीचे कीर्तिश भट्ट, पंजाब केसरीचे शेखर गुरेरा, द हिंदूचे सुरेंद्र कुमार, डी.बी. पोस्टचे मन्सूर नकवी आणि इरफान खान व देवेंद्र शर्मा यांच्यासारख्या विख्यात व्यंगचित्रकारांनी आपली व्यंगचित्रे पाठविली आहेत. बिगर-व्यावसायिक श्रेणीत नवोदित व्यंगचित्रकारांनी मोठ्या संख्येत आपापली व्यंगचित्रे पाठविली आहेत. त्यातील निवडक व्यंगचित्रे आम्ही आज गुरुवारी प्रकाशित करीत आहोत. व्यंगचित्र स्पर्धेतील विजेत्यांची नावे लोकमत वृत्तपत्र समूह लवकरच घोषित करेल.