सायबर लॅबसाठी प्रत्येक जिल्ह्याला १८ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2015 12:53 AM2015-05-02T00:53:32+5:302015-05-02T00:53:32+5:30
सायबर गुन्हे रोखण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्णात सायबर लॅब उभारण्यासाठी १८ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून या
चंद्रपूर : सायबर गुन्हे रोखण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्णात सायबर लॅब उभारण्यासाठी १८ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून या माध्यामतून हे गुन्हे तातडीने उघडकीस आणणे शक्य होणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी दिली.
चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयातर्फे उभारलेल्या अत्याधुनिक सोशल मीडिया लॅबचे आणि मोबाईल सीसीटीव्ही व्हॅनच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होत़े
पोलीस अधीक्षक कार्यालयात सोशल मीडिया नियंत्रित करण्यासाठी लॅब उभारण्यात आली आहे. या लॅबमध्ये दोन सर्व्हर, आठ संगणक, तीन लॅपटॅब व दोन टॅब अशी यंत्रणा आहे. सोशल मिडियावर टाकलेल्या पोस्टमुळे होणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी या लॅबमध्ये काम केले जाणार आहे. या ठिकाणी सोशल मीडियावरील पोस्ट, बातम्या, व्हिडीओ यांचे विश्लेषण करण्याची सोय आहे. फेसबुब, व्हाट्अॅप, युट्युुब, व्टिटर अशा एकूण १८ प्लॅटफार्म व १०० संकेतस्थळाचे नियंत्रण करण्याची व्यवस्था लॅबमध्ये आहे. ३२ भाषा, २५ आंतरराष्ट्रीय भाषा आदीचे विश्लेषण करणारे सॉफ्टवेअरही या लॅबमध्ये आहे. (प्रतिनिधी)