बोकडाचे कान गोसाव्याच्या हातात असतात - रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 05:51 AM2019-02-24T05:51:58+5:302019-02-24T05:52:20+5:30

अर्जुन खोतकरांसोबत माझे वैयक्तिक भांडण नाही

The ear of the goose is in the hands of Gosavi - Raosaheb Danwe | बोकडाचे कान गोसाव्याच्या हातात असतात - रावसाहेब दानवे

बोकडाचे कान गोसाव्याच्या हातात असतात - रावसाहेब दानवे

googlenewsNext

- विजय सरवदे


युती होण्यापूर्वी रुसवा-फुगवा होता. आता युती झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपा उमेदवारांचा प्रचार करतील, तर भाजपाचे कार्यकर्ते शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करतील. नाही तर शेवटी ‘बोकडाचे कान गोसाव्याच्या हातात असतात,’ अशा शेलक्या शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाराजांना चिमटा काढला. दानवे यांनी ‘लोकमत’ कार्यालयास धावती भेट दिली. त्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कसलाही आडपडदा न ठेवता अगदी दिलखुलास गप्पा मारल्या.


प्रश्न : खोतकरांनी तुमच्याविरुद्ध आघाडी उघडली आहे. त्याचं काय?
उत्तर : अर्जुनराव आणि माझं कसलंही भांडण नाही. वाद होता तो युती तुटल्याचा. आता युती झाली आहे. त्यामुळं त्यांचा राग कमी होईल.


प्रश्न : काही ठिकाणी शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते एकमेकांच्या उमेदवाराची कामं करतील...
उत्तर : सेना-भाजपाचा मतदार एकच आहे. त्यामुळं युतीमध्ये एकमेकांच्या उमेदवारांची कामं करावीच लागतील. नाही तर शेवटी ‘बोकडाचे कान गोसाव्याच्या हातात असतात.’ ज्याला असं वाटतं की, या बेट्याचं पाहून घेऊ. त्या बेट्यालाही मग वाटतं, याचंही पुढं पाहून घेऊ. प्रत्येक जण आपलं भविष्य शोधत असतो. ‘शिर सलामत, तो पगड़ी हजार’ याप्रमाणं जे होणार आहे, ते होणारच आहे. त्यामुळं कशाला आपण उगीच विरोधात उडी घ्यायची, असाही विचार होतो.


प्रश्न : तुम्हाला अशा चपखल म्हणी कशा काय सुचतात?
उत्तर : माझा ग्रामीण टच आहे. मी एकदा गावात भाषण करीत होतो. आताच युरिया का मुबलक भेटतो, असं शेतकऱ्यांनी विचारलं. तेव्हा म्हणालो, तुमच्यापैकी कोणी-कोणी बकºया वळल्या. समोरून दोन हात वर केले गेले. मग, मी त्यांना म्हणालो, बकरीमागं दिवसभर पिलं सोडली, तर बकरीला दूध राहील का. समोरून उत्तर आलं, नाही. दूध राहण्यासाठी बकरीला आळपणं घालावं लागतं किंवा कडुनिंब ठेचून लेप लावावा लागतो.

सत्तारांची प्रतिज्ञा...
हे बघा, लोक बाभळीच्या झाडाला दगड मारत नसतात, ते आंब्याच्याच झाडाला मारत असतात. आज माझ्या शब्दाला किंमत आहे. काही जणांना ते पटत नाही म्हणून विरोधक प्रतिज्ञा करीत असतात.
( काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी दानवे यांच्या पराभवासाठी प्रतिज्ञा केली आहे.)

राज्यात कसे वाटते?
मी सरपंच होतो. तेव्हा खूप इमानदारीनं काम केलं. मग, मी पंचायत समिती सभापती झालो. लोकांनी मला आमदार केलं. खासदार केलं. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच यादीत माझं नाव होतं. केंद्रीय मंत्री झालो. मोदीं साहेबांनी मला संघटना वाढीचं काम दिलं. माझ्या मतदारसंघासाठी ६ हजार कोटींची कामं हाती घेतली आहेत.

या वेळी किती यश मिळेल?
राज्यामध्ये मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ४२ जागा जिंकल्या होत्या. यंदा आम्ही ४३ जागा जिंकू, ४१ होणार नाहीत.

आता मोदींनी निमकोट’ युरिया आणला आहे. हा युरिया उद्योजकांनी त्यांच्या युरियात मिसळला की, तो खराब होतो. - रावसाहेब दानवे

Web Title: The ear of the goose is in the hands of Gosavi - Raosaheb Danwe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.