पावती देणाऱ्या मतदान यंत्राबाबत लवकर निर्णय

By admin | Published: March 22, 2017 02:43 AM2017-03-22T02:43:00+5:302017-03-22T02:43:00+5:30

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत व्होटर व्हेरिफायबल पेपर आॅडिट ट्रेल (मतदानाच्या अचुकतेची पावती दर्शविणारे यंत्र) वापरण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा मानस आहे.

Early decision about receipt of polling machine | पावती देणाऱ्या मतदान यंत्राबाबत लवकर निर्णय

पावती देणाऱ्या मतदान यंत्राबाबत लवकर निर्णय

Next

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत व्होटर व्हेरिफायबल पेपर आॅडिट ट्रेल (मतदानाच्या अचुकतेची पावती दर्शविणारे यंत्र) वापरण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा मानस आहे. पण सर्वंकष विचारविनिमयानंतर त्याच्या वापराबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी मंगळवारी येथे दिली.
मान्यताप्राप्त नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात मंगळवारी बैठकी झाली. आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांच्यासह विविध पक्षांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन आॅफ इंडिया या कंपनीच्या प्रतिनिधींनी या वेळी नव्या यंत्रांचे प्रात्यक्षिक उपस्थितांना दाखविले.
या यंत्रामुळे कुणाला मतदान केले याची मतदाराला खात्री करता येते. केंद्रीय निवडणूक आयोगाने देशात काही ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर या यंत्राचा वापर सुरू केला आहे. त्याचप्रमाणे राज्य निवडणूक आयोग विचार करीत आहे; परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होतात. त्या अनुषंगाने या यंत्रात बदल करण्यासंदर्भात इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन आॅफ इंडिया या कंपनीला कळविण्यात आले होते. त्यांनी सध्या प्राथमिक स्वरूपात हे यंत्र तयार केले आहे, असेही या वेळी सहारिया यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Early decision about receipt of polling machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.