आय घोषणा योजनेसाठी प्रयत्न
By Admin | Published: July 1, 2016 04:23 AM2016-07-01T04:23:37+5:302016-07-01T04:23:37+5:30
‘आय घोषणा योजना २०१६’ च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आयकर विभागातर्फे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.
मुंबई : ‘आय घोषणा योजना २०१६’ च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आयकर विभागातर्फे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. विभागातील अधिकारी आणि कर्मचारी या योजनेचे फायदे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत; यासाठी कार्यरत आहेत. पवई, सायन आणि अंधेरी या विभागांत घरोघरी पत्रक वितरित करण्यात आले आहेत. या विभागातील अधिकारी जागोजागी व्यापारी, व्यवसायिक, सीए, वकील संघटनांसह लोकांमध्ये सभा व चर्चासत्रे घेत असून, याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे आयकर विभागातर्फे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)