आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन आॅक्टोबरपूर्वी

By admin | Published: April 19, 2015 12:41 AM2015-04-19T00:41:01+5:302015-04-19T00:41:01+5:30

मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन आॅक्टोबरमध्ये म्हणजे धम्मचक्र प्रवर्तनदिनापूर्वी करण्याचा सरकारचा मानस आहे,

Before the earthquake of Ambedkar memorial, | आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन आॅक्टोबरपूर्वी

आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन आॅक्टोबरपूर्वी

Next

नागपूर : मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन आॅक्टोबरमध्ये म्हणजे धम्मचक्र प्रवर्तनदिनापूर्वी करण्याचा सरकारचा मानस आहे, अशी माहिती सामाजिक न्यायखात्याचे मंत्री राजकुमार बडोले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष सामाजिक समता वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यानिमित्त राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती बडोले यांनी दिली. मुंबईच्या इंदू मिलच्या जागेवर होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनाकडे त्यांचे लक्ष वेधले असता बडोले म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यावर या प्रक्रियेला गती आली आहे. जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. आॅक्टोबरपर्यंत म्हणजे धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या वर्धापनदिनापूर्वी भूमिपूजन करण्याचा सरकारचा मानस आहे. काँग्रेसने इंदू मिलमध्ये केलेल्या प्रतिकात्मक भूमिपूजनासंदर्भात बडोले म्हणाले की, काँग्रेसकडून हा श्रेय लाटण्याचा
प्रकार आहे. स्मारक व्हावे
म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत. (प्रतिनिधी)

सामाजिक समता वर्ष
सामाजिक समता वर्षाच्या निमित्ताने विविध योजना राबविण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती वाटपातही पारदर्शकता आणण्यात येईल. ज्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळत नाही त्यापैकी काहींचा विचार शिष्यवृत्तीसाठी केला जाईल. संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेचे अनुदान वाटप बायोमेट्रिक पद्धतीने केले जाईल आणि जात वैधता प्रमाणपत्राचे कक्ष प्रत्येक जिल्ह्णात या महिन्यात सुरू होईल, असे बडोले म्हणाले.

लंडनमध्ये
होणार स्मारक
राजकुमार बडोले म्हणाले की, लंडन येथे संग्रहालय आणि वाचनालय सुरू करण्याचा विचार आहे. त्याचप्रमाणे लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेअर स्थापन करणे, त्याचप्रमाणे आंबेडकर यांच्या नावाने फेलोशिप सुरू करण्यात येणार असून, लंडनमध्ये राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा सरकारचा मानस असल्याचे ते म्हणाले़

Web Title: Before the earthquake of Ambedkar memorial,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.