कोयनानगर चिपळूण परिसरात भूकंपाचा धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 18:07 IST2021-04-20T18:05:25+5:302021-04-20T18:07:00+5:30
Earthquake Satara : सलग दोन भुकंपाच्या धक्काने मंगळवारी कोयना, पाटण, चिपळूण परिसर हादुरन गेला. मंगळवारी दुपारी ३ वाजून २१ मिनिटानी आणि त्यानंतर ३ वाजून ३३ मिनिटानी दूसरा भुकंपाचा धक्का जाणवला. १२ मिनिटांच्या अंतराने दोन धक्के जाणवल्याने लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

कोयनानगर चिपळूण परिसरात भूकंपाचा धक्का
कोयनानगर : सलग दोन भुकंपाच्या धक्काने मंगळवारी कोयना, पाटण, चिपळूण परिसर हादुरन गेला. मंगळवारी दुपारी ३ वाजून २१ मिनिटानी आणि त्यानंतर ३ वाजून ३३ मिनिटानी दूसरा भुकंपाचा धक्का जाणवला. १२ मिनिटांच्या अंतराने दोन धक्के जाणवल्याने लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
कोयना येथील भूकंपमापन केंद्रावर या दोन भूकंपाच्या धक्कयाची नोद झाली असुन पहिल्या भुकंपाची तीव्रता 3 रिश्टर स्केल होती. भुकंपाच्या केद्रबिदुची खोली १६ किमी इतकी होती. त्यानंतर १२ मिनिटांनी झालेल्या दुसऱ्या भुकंपाची तीव्रता २.८ रिश्टर स्केल इतकी होती. याची खोली १५ किमी होती.
दोन्ही भुकंपाचा केद्रबिदु कोयना धरणापासुन २० किमी अंतरावर वारणा खोऱ्यातील चिखली गावाच्या पुर्वेस ७ किमी होता. भुकंपाचे सलग दोन धक्के पाटण, कोयना आणि चिपळूण परिसरात जाणवले. जमिनी व घर थरथरल्याने लोक भीतीने घराबाहेर पडले. कोयना धरण सुरक्षित असुन या भुकंपाचा धक्क्याने कोणतीही वित्तहानी झालेली नाही अशी माहिती कोयना सिंचन विभागाने दिली आहे.