भूकंपाच्या धक्क्याने उडाली झोप!

By admin | Published: December 30, 2015 10:33 PM2015-12-30T22:33:34+5:302015-12-31T00:25:19+5:30

३.१ रिश्टर स्केल : कोयनेपासून १२.८ किलोमीटर अंतरावर केंद्रबिंदू

Earthquake shook! | भूकंपाच्या धक्क्याने उडाली झोप!

भूकंपाच्या धक्क्याने उडाली झोप!

Next

पाटण : भूकंपाचे माहेरघर असणाऱ्या कोयना परिसराला मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ३.१ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. या धक्क्यामुळे नुकतेच झोपी गेलेले कोयना परिसरातील लोक जागे झाले. कोयना धरणापासून १२.८ किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या धक्क्यामुळे कोयना धरणाला कोणताही धोका निर्माण झाला नाही. तसेच कोयना परिसरात कोणतीही वित्त व जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.
मंगळवारी रात्री ११ वाजून ५६ मिनिटांनी भूकंप झाला. ३.१ रिश्टर स्केल क्षमतेच्या या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणाच्या नजीक असणाऱ्या गोषटवाडी गावापासून ६ किलोमीटर अंतरावर तर धरणापासून १२.८ किलोमीटर अंतरावर होता. या भूकंपाची खोली ९ किलोमीटर होती. या भूकंपाचा धक्का कोयना, अलोरे, पाटण, चिपळूण चांदोलीसह संपूर्ण सातारा जिल्ह्याला जाणवला. भूकंप मध्यरात्री झाल्यामुळे गाढ झोपेत असणारे लोक धक्क्याने दचकून जागे झाले. काहीजण घरातून बाहेर धावले. कोयना धरण सुरक्षित असून सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यांच्या सिमेवर देखील या भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला.


भूकंपग्रस्त दाखल्यांचे महत्त्व कळाले
नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार देसार्इंनी पाटण तालुक्याला भूकंपग्रस्त दाखले मिळण्याची प्रक्रिया सुरू करून घेतली आहे. त्यातच मंंगळवारी भूकंपाचा धक्का बसल्यामुळे भूकंप दाखल्याचे महत्त्व जाणवले.

Web Title: Earthquake shook!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.