महिलांसाठी सोपे नियम
By admin | Published: April 14, 2017 01:52 AM2017-04-14T01:52:42+5:302017-04-14T01:52:42+5:30
विवाहानंतर किंवा घटस्फोटानंतर महिलांना पासपोर्टवरील आपले नाव बदलण्याची गरज नाही, अशी घोषणा गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. आई वडीलांचे
मुंबई : विवाहानंतर किंवा घटस्फोटानंतर महिलांना पासपोर्टवरील आपले नाव बदलण्याची गरज नाही, अशी घोषणा गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. आई वडीलांचे नाव देऊन या महिला आपले प्रवासाचे कागदपत्रे प्राप्त करु शकतात, असेही त्यांनी सांगितले.
पासपोर्टच्या नियमात आता बदल करण्यात आला आहे. महिलांना आता विवाहाचे किंवा घटस्फोटाचे प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. पासपोर्टवर महिलेच्या आई किंवा वडिलांचे नाव आता असायला हवे. इंडियन मर्चंट चेंबर्सच्या महिला शाखेला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित करताना मोदी म्हणाले की, महिलांना सशक्त करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. मुद्रा लोनचे ७० टक्के कर्ज महिला व्यावसायिकांना देण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
.... पुरुषांपेक्षा नेहमीच पुढे राहिले
मोदी म्हणाले की, सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत एक कोटींपेक्षा अधिक बँक खाते उघडण्यात आले आहेत. जिथे महिलांना संधी देण्यात आली तिथे त्यांनी दाखवून दिले की, त्या पुरुषांपेक्षा दोन पाऊले पुढे आहेत. डेअरी आणि पशुधन क्षेत्रांमध्ये महिलांचे योगदान मोठे आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत महिलेच्या नावावर घर नोंदणी करण्यास प्राधान्य दिले आहे.