सीमा भागातील मराठी भाषक विद्यार्थ्यांना ईबीसी सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 05:04 AM2018-02-01T05:04:56+5:302018-02-01T05:05:11+5:30
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील महाविद्यालयांत पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेणाºया मराठी भाषिक विद्यार्थ्यांना खास बाब म्हणून ईबीसी सवलत लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने आज घेतला.
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील महाविद्यालयांत पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेणाºया मराठी भाषिक विद्यार्थ्यांना खास बाब म्हणून ईबीसी सवलत लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने आज घेतला.
संबंधित गावातील सरपंच, नगराध्यक्ष, महापौर, आमदार, विशेष कार्यकारी अधिकारी यांच्यापैकी कोणाच्याही स्वाक्षरीचा संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकाचा उत्पन्नाचा दाखला ईबीसी सवलतीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. सीमा भागातील कोणताही मराठी भाषिक विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने हा निर्णय घेतला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिक विद्यार्थी महाराष्ट्रातील सीमा भागात असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात. त्यांना कनिष्ठ महाविद्यालय ते पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेण्यासाठी ईबीसी सवलत दिली जाईल. सीमा वादाबाबतचा निर्णय हा निर्णय होईपर्यंत लागू राहील.