निवडणूक आयोगाकडून शिक्कामोर्तब; वंचित बहुजन आघाडी ‘या’ नव्या चिन्हावर विधानसभा लढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 02:08 PM2024-08-16T14:08:46+5:302024-08-16T14:09:01+5:30

Vanchit Bahujan Aghadi News: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला नवे चिन्ह दिले आहे.

eci allotted gas cylinder symbol to vanchit bahujan aaghadi for all assembly constituencies in maharashtra upcoming vidhan sabha elections | निवडणूक आयोगाकडून शिक्कामोर्तब; वंचित बहुजन आघाडी ‘या’ नव्या चिन्हावर विधानसभा लढणार

निवडणूक आयोगाकडून शिक्कामोर्तब; वंचित बहुजन आघाडी ‘या’ नव्या चिन्हावर विधानसभा लढणार

Vanchit Bahujan Aghadi News: लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला फारशी चांगली कामगिरी करता आली नसल्याचे पाहायला मिळाले. प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूक लढवली. परंतु, त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तिसरी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न राज्यात होताना दिसत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीनेही आपापल्या स्तरावर तयारीला सुरुवात केली आहे. यातच आता वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुका लढण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने नवे चिन्ह दिले आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी जोरात सुरू केली आहे. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी हा पक्ष मागे नाही. केंद्रीय निवडणुक आयोग सचिवालयाकडून एक पत्र जारी करण्यात आले. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात 'गॅस सिलेंडर' चिन्ह दिल्याचे घोषित केले आहे.

आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात दौरा

२५ जुलै ते ७ ऑगस्ट या काळात वंचित बहुजन आघाडीने आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात दौरा केला. विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने जोरदार तयारी केल्याचे दिसले. राज्यातील संपूर्ण विधानसभा मतदारसंघात गॅस सिलेंडर चिन्ह निवडणूक आयोगाकडून मिळाल्याने वंचित बहुजन आघाडीसाठी ही चांगली बाब मानली जात आहे. 

दरम्यान, २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या सर्वच मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने 'गॅस सिलेंडर' या चिन्हावर निवडणूक लढवली होती. विधासभा निवडणुकांत काही ठिकाणी कपबशी, तर काही ठिकाणी गॅस सिलेंडर अशा वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. 

 

Web Title: eci allotted gas cylinder symbol to vanchit bahujan aaghadi for all assembly constituencies in maharashtra upcoming vidhan sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.