मानवी अवयवांचे अनोखो म्युझियम

By Admin | Published: October 11, 2016 06:58 PM2016-10-11T18:58:29+5:302016-10-11T18:58:29+5:30

शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात शरीररचनेचा समावेश असतो. परंतु अनेकदा हा अभ्यास केवळ पुस्तकापुरताच मर्यादित राहतो. हीच परिस्थिती लक्षात घेऊन शासकीय वैद्यकीय

An eclectic museum of human organisms | मानवी अवयवांचे अनोखो म्युझियम

मानवी अवयवांचे अनोखो म्युझियम

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि.11 - शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात शरीररचनेचा समावेश असतो. परंतु अनेकदा हा अभ्यास केवळ पुस्तकापुरताच मर्यादित राहतो.  हीच परिस्थिती लक्षात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे मानवी अवयवांचे अनोखो म्युझियम साकारण्यात आले आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना मेंदू, हृदय, किडनी ,फुफ्फुस यासह शरीरातील विविध अवयव प्रत्यक्षात पाहण्याची संधी मिळत आहे.
घाटी रुग्णालयातील शरीररचनाशास्त्र विभागात हे अनोखे म्युझिमय साकारण्यात आले आहे.  शरीरातील मेंदू, हृदय, किडनी, फुफ्फुस प्रत्यक्षात कसे दिसतात, असा प्रश्न अनेकदा विद्यार्थ्यांना पडतो. केवळ पुस्तकातील चित्र स्वरुप पाहून त्याची रचना समजून घेण्याची वेळ येते. अनेकदा त्यातून विद्यार्थ्यांना मनातील प्रश्नांची उत्तरे मिळत नाही. मात्र मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे या म्युझियमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांना मिळतात. शरीरातील मेंदूपासून तर पायापर्यंतचे विविध अवयव या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाहता येत आहेत. या ठिकाणी शरीरातील अवयवांचे केवळ दर्शनच होत नाही, तर येथील तज्ज्ञ विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे निरसन करून मार्गदर्शन करतात. विविध अवयवांचे कार्य कसे चालते, त्यांची रचना कशी आहे, हे समजून सांगतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते. शैक्षणिक आणि भावी आयुष्यासाठी महत्वपूर्ण ठरत आहे. विद्यार्थ्यांना शुक्रवारी हे म्युझिमय पाहता येणार आहे. त्यासाठी पूर्व कल्पना द्यावी लागेल. तसेच विद्यार्थ्यांसोबत शिक्षक असणे आवश्यक राहणार आहे.

अवयवदानाचा प्रसार व्हावा
म्युझियमच्या माध्यमातून शरीरातील प्रत्येक अवयवाची माहिती विद्यार्थ्यांना घेता येत आहे. एकदा ही माहिती घेतल्यानंतर विद्यार्थी ती कधीही विसरणार नाहीत. त्याचा त्यांना शैक्षणिक दृष्ट्या फायदा होईल. समाजात अवयवदानाचा प्रचार-प्रसार झाला पाहिजे, यासाठीही प्रयत्न केला जात आहे.
-डॉ. शिवाजी सुक्रे, प्राध्यापक व विभागप्रमुख, शरीररचनाशास्त्र विभाग, घाटी रुग्णालय

Web Title: An eclectic museum of human organisms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.