इको-फ्रेंडली गणेशोत्सवासाठी विद्यार्थी सरसावले
By admin | Published: September 16, 2015 10:03 PM2015-09-16T22:03:09+5:302015-09-18T11:17:12+5:30
चिमुकल्यांनी घडविले गणराज : सिन्नर तालुक्यात विविध शाळांमध्ये शाडूमातीपासून गणेशमूर्ती घडविण्याची कार्यशाळा
सिन्नर : जलप्रदूषणाला आळा घालत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना फाटा देत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची मागणी सर्वच स्तरांतून जोर धरू लागली आहे. याचाच एक भाग म्हणून येथील एस.जी. पब्लिक स्कूल, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सरदवाडी प्राथमिक विद्यामंदिरासह तालुक्यातील पाथरे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शाडूमाती-पासून गणेशमूर्ती घडविण्याची कार्यशाळा घेण्यात आली.
एस.जी. पब्लिक स्कूल
एस.जी. पब्लिक स्कूलच्या प्राथमिक विभागात घेण्यात
आलेल्या शाडूमाती गणेशमूर्ती कार्यशाळेत २२५ विद्यार्थी सहभागी झाले होते.
मुख्याध्यापक उदय कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यशाळेत माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे सचिव राजेश गडाख यांनी इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. चार दिवस भिजत ठेवलेल्या शाडूमातीचे गोळे करून विद्यार्थ्यांना देण्यात आले. कलाशिक्षक गणेश तिडके, बापू चतुर, वृषाली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी लाडक्या गणरायाच्या विविध सुबक मुद्रा साकारल्या.
या प्रसंगी भास्कर गुरुळे, पांडुरंग लोहकरे, शिवाजी कांदळकर, मनीषा जाधव, जयश्री सोनजे, विनायक काकुळते, सतीश बनसोडे, प्रमोद महाजन, सागर भालेराव, सुधाकर कोकाटे, पल्लवी अढांगळे, अमोल पवार, गणेश सुके, नीलेश मुळले, मंदा नागरे, जिजा ताडगे, संदीप गडाख आदिंसह विद्यार्थी उपस्थित होते. पाथरे येथील पाथरे हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात घेण्यात आलेल्या शाडूमाती गणेशमूर्ती कार्यशाळेत पाचवी ते बारावीचे सुमारे २५० विद्यार्थी सहभागी झाले होते.
प्राचार्य विद्या साळुंखे, पर्यवेक्षक नामदेव कानसकर, कलाशिक्षक प्रशांत दातरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी सृजनशीलतेचे दर्शन घडवत मनमोहक गणेशमूर्ती तयार केल्या.
या प्रसंगी संजय जाधव, कृष्णाजी घोटेकर, रंगनाथ चिने, उत्तम खैरनार, माधव शिंदे, रामचंद्र थोरात, संजय शेलार, किरण कुलकर्णी, सारिका उबाळे, छाया शेळके, बाबासाहेब डुंबरे, रमेश गडाख, नवनाथ कांबळे, नवनाथ पाटील, भारती खंबाईत, बाळासाहेब सिरसाट, रावसाहेब मोकळ आदिंसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)