मेक्सिकोमध्ये इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा

By admin | Published: September 19, 2016 05:21 PM2016-09-19T17:21:58+5:302016-09-19T17:21:58+5:30

मी आणि माझा मित्र युवराज विठोबा सातकर, आम्ही दोघांनी मिळुन पहिल्यांदाच मेक्सिको मध्ये गणेश उत्सव साजरा केलेला आहे.

EcoFrenthly Ganeshotsav celebrated in Mexico | मेक्सिकोमध्ये इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा

मेक्सिकोमध्ये इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा

Next
>- प्रदीप धनराज नाहीदे 
मी आणि माझा मित्र युवराज विठोबा सातकर, आम्ही दोघांनी मिळुन पहिल्यांदाच मेक्सिको मध्ये गणेश उत्सव साजरा केलेला आहे. आम्ही दोघेही गुआनाजुअतो विद्यापीठामध्ये केमेस्ट्री मध्ये पीचडी करत आहोत. मी मुळचा जळगावचा असून युवराज हा शिरपुर तालुक्यातील दहिवद गावाचा आहे. माझे शिक्षण जळगाव मधील मुलजी जेठा येथे तसेच पुण्यातील आर सी पटेल कॉलेजमध्ये केले आहे तर एमएसस्सी फर्गुसनमध्ये केले आहे. आम्ही सध्या मेक्सिको मध्ये मागील २ वर्षापासून राहत आहे तसेच आम्ही दोघे “सेंथिसीस ऑफ बायोलॉजीकली अ‍ॅक्टीव नॅचरल कंपाऊंडस्” या विषयावर पी.एचडी करीत आहोत. 
दोघेही गणेशाचे भक्त असून आपल्या बाप्पाही आराधना करण्याची मनात खूप इच्छाशक्ती होती. पण हे सर्व मेक्सिको सारख्या देशात जिथे भारतीय सण आणि संस्कृति बद्दल इथल्या नागरिकांना जास्त माहिती नसल्याने गणेशोत्सव कसा साजरा करावा याबद्दल चा विचार मनात खूप त्रास देता होता. तसेच ह्या देशात स्पानिष सारखी भाषा बोलली जात असल्याने त्या लोकांना आपल्या मराठी भाषेविषयी काहीही माहिती नव्हते. पण कसलाही विचार न करता आपण गणेशोत्सव साजरा करणारच हा निर्धार केला आणि तो पूर्ण करण्याचे धाडस केले.
 
पण बाप्पाची मूर्ती आणण्याची कुठून आणि कुठे साजरा करायचा ?
भारतासह जगात अनेक ठिकाणी गणेशोत्सव मोठ्याप्रमाणावर साजरा करण्यात येत असतो. परंतु अनेक देशांमध्ये भारतीयांची कमतरता असल्याने हवा तसा गणेशोत्सव साजरा करण्यात येत नाही. 
सर्वप्रथम आम्हा दोघांनी गणेशाची मूर्ती कशी मिळवावी कशी ह्याचा शोध सुरु केला. ईच्छा असेल तेथे मार्ग सापडतो. एखाद्या मेक्सिकन कुंभाराकडून ती बनवावी असा विचार मनात आला पण हवा तसा माणूस मिळाला नाही. पण देवाची कृपा किंवा योगायोग म्हटला तरी चालेल ह्या गुअनजुअतो शहरामध्ये आम्ही भारतीय देवदेवतांचे मूर्ती असलेल्या दुकानाचा शोध घेतला. तेंव्हा जुलिओ सिसर ह्या मेक्सिकन दुकानदाराकडे बाप्पाची मूर्ती दिसली. मूर्ती पाहून दोघांना खूप आनंद झाला. क्षणाचाही विचार न करता त्याला मुर्ती देण्यास सांगितले. त्याला आपल्या गणेशोत्सवाबदल माहिती दिली आणि तो साजरा करायची इच्छा आहे असे सांगितले. त्याने ती स्वताची गणेशाची मूर्ती दहा दिवसातही देऊन टाकली. आणि तोही आपल्या कुटुंबासह आणि मित्रांसोबत आमच्यासोबत सहभागी झाला. काही मेक्सिकन लोकांना आपल्या हिंदू देवांबद्दल सुद्धा माहिती होती त्यात जुलिओ सिसर सुद्धा होता.  गणेश चतुर्थी ला सर्व मित्र मंडळी आणि युनिव्हर्सिटी मधील प्राध्यापकांना आम्ही निमंत्रण दिले आणि सर्वांनी आपली हजेरी लावली. गुअनजुअतो विध्यापिठातील प्राध्यापक डॉक्टर सिसर रोगेलिओ अल्वार्डो ह्यांच्या यांच्या हस्ते मूर्तीची स्थापना आणि बापाप्ची पहिली आरती करण्यात आली. मराठी गणेश आरती मेक्सिकन नागरिकांना म्हणता येत नसतांनाही त्यांनी टाळ्या वाजवून सहभाग घेतला. त्यानंतर उपस्थितांना भारतीय पध्दतीचा मसाला भात प्रसाद म्हणून देण्यात आला. गणेशोस्तव हा आमच्या राहत्या घरी मेक्सिकन कुटुंबासह करण्यात आला. बाप्पा ची गाणे ऐकण्यात आली. इथे स्पानिश भाषा बोलली जात असून सुद्धा आम्ही त्या सर्व मेक्सिकन नागरिकांना मराठी भाषा आणि आपल्या भारतीय संस्कृतीचे महत्व पटवून दिले. आपल्या संस्कृति आणि बाप्पा वरील प्रेम यातून प्रेरणा घेत आम्ही  दोघांनी हा गणेशोत्सव साजर करण्याचा निर्धार केला होता. आणि देवकृपेने तो सुखरूप पार पडला. युटूब वर त्यांना बाप्पाची गाणी दाखवण्यात आली . तसेच  ढोल ताशे वाजवून कसा आपला गणेशोत्सव साजरा केला जातो तेही दाखवले.
आमच्या मेक्सिकन घरमालक आजीनी त्यांचे मेक्सिकन लोकांना शाकाहारी जेवण दिले. आणि हा गणेशोत्सव विशेष म्हणजे त्या आजींच्या घरी आम्ही साजर करत आहोत. एका मेक्सिकन नागरीकडून असा प्रतिसाद मिळणे म्हणजे खूप मोठी गोष्ट. कारण त्या सुद्धा हिंदू संस्कृतिला मानतात. युवराज च्या राहत्या घरीच आम्ही गणेशोत्सव करीत आहोत. दहा दिवस मी प्रदीप आणि युवराज दोघांनी मासाहार बंद ठेवणार आहे असे मेक्सिकन नागरिकांना सांगितल्यावर  त्यांना आश्चर्य वाटले.
पर्यावरणाचे संरक्षण करणे हि काळाची गरज असून गणेशोस्तव हा इकोफ्रेन्डली साजर करावा म्हणून सजावटीसाठी आम्ही विविध प्रकारची लहान झाडे, फुले, फळे वापरली झाडे लावा आणि झाडे जगवा असा संदेश दिला.
 
 
गणेश विसर्जन
आज आम्ही आनंदाने बाप्प्पाला निरोप दिला आणि पुढच्या वर्षी लवकर या म्हणत अजून एकदा मेक्सिको मध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचे स्वप्न पूर्ण केले.  
सलग दहा दिवस चाललेल्या ह्या गणेशोत्सवाला अनेक मेक्सिकन नागरिकांनी भेट दिली आणि आपल्या भारतीय संस्कृति बदल जाणून घेतले. तसेच त्यांना बाप्पाचे दर्शन घेतले. काहींनी स्वतचे बाप्पासोबत फोटो काढून घेतले. ह्या सर्व दिवसात त्त्यांनी आमच्यासोबत भक्तिभावाने पूजा केली. 
मेक्सिको मध्ये असल्याने आमच्या शहरात ढोल, ताशा, टाळ अशा गोष्टी नसल्या तरी गणेश विसर्जन आनंदाने मेक्सिकन मित्र मंडळी आणि कुटुंबासह पार पाडण्यात आले. आरती म्हणून गणरायाच्या निरोपाची तयारी करण्यात आली. इकोफ्रेण्डली गणेशोस्तव असल्याने लहान मूर्तीला राहत्या घरी एका मोठ्या पाण्याच्या भांड्यामध्ये बुडवून तिचे विसर्जन करण्यात आले . यावेळी परत एकदा आमचे मेक्सिकन मित्र मंडळीनी बाप्पाच्या गाण्यांवर नाचत आपला आनंद व्यक्त केला. तसेच युटूब वर पुन्हा एकदा त्यांना भारतात चाललेल्या गणपती विसर्जनाची live दृश्ये दाखविण्यात आली . आणि पुन्हा एकदा त्यांना आपला प्रसाद म्हणून भारतीय विविध गोड पदार्थ देण्यात आले. 
जुलिओ सिसर ह्याला त्याची मूर्ती परत करून पुढच्या वर्षी सुद्धा स्वतः गणेशोत्सव मध्ये भाग घेणार असे सांगितले. विधीनुसार झालेल्या विसर्जनात हा गणेशोत्सव सुखरूप पार पडल्याने खूप आनंद होत आहे. आपली भारतीय संकृती आणि परंपरा जपण्याची इच्छा पूर्ण होत असल्याने मनापासून आनंद होतोय. आपल्या भारतीय संकृती जपण्याचा खूप अभिमान वाटत आहे. असेच नेहमी आपल्या भारतीय सणांचा आदर करून मनाशी निर्धार करून जास्तीत जास्त आपली संस्कृति मेक्सिकन लोकांपर्यत पोचवण्याचे धाडस केले आहे. 
यावेळी दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाला मेक्सिकन नागरिक आणि मित्र मंडळी जसे डॉक्टर ओस्कार, ज्जुलिएता गुररा, पावलिना ओर्नेलीस , सिनोएल, गांधी, जेस्स्सिका मोरा, रोसाल्वा, रोईस, मोन्से, शेईला , रेनाल्डो, जोसे , आणि एन्रिके, एक्षोन ह्यांची उपस्थिती होती. त्या सर्वांचे मनापासून आभार आम्हा दोघांकडून मानण्यात आले.

Web Title: EcoFrenthly Ganeshotsav celebrated in Mexico

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.