इंग्लंडवरून ललित मोदीचे प्रत्यार्पण करण्यासाठी ईडी न्यायालयात
By admin | Published: November 10, 2016 05:33 AM2016-11-10T05:33:09+5:302016-11-10T05:33:09+5:30
भारत भेटीदरम्यान इंग्लंडच्या पंतप्रधानांनी इंग्लंडमध्ये आश्रय घेतला भारतीय आरोपींची यादी घेतली.
मुंबई : भारत भेटीदरम्यान इंग्लंडच्या पंतप्रधानांनी इंग्लंडमध्ये आश्रय घेतला भारतीय आरोपींची यादी घेतली. या औपचारिकतेच्या दुसऱ्याच दिवशी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विशेष पीएमएलए (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लाँड्रींग अॅक्ट) न्यायालयात ललित मोदींच्या प्रत्यार्पणासाठी अर्ज केला.
इंडियन प्रिमियर लिगचे (आयपीएल) माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी २०१० मध्ये देश सोडून इंग्लंडमध्ये आश्रय घेतला. ललित मोदींविरुद्ध यापूर्वीच अजामिनपात्र वॉरंट जारी केले आहे. तसेच इंग्लंड, मलेशिया आणि युएई या देशांतील न्यायालयाने सहाय्य करावे, यासाठी लेटर आॅफ रोगेटरी (एलआर) पाठवले आहे. मोदींची चौकशी करायची असल्याने त्यांचा ताबा घेण्याकरिता प्रत्यार्पण करणे आवश्यक आहे. त्यासाठी ईडीने विशेष न्यायालयाय अर्ज केल्याची माहिती ईडीच्या वकिलांनी दिली. ललित मोदी यांनी आयपीएलच्या निधीचा गैरव्यवहार केल्याची तक्रार २०१० मध्ये बीसीसीआयने केली होती. (प्रतिनिधी)