सिंचन घोटाळ्याची कागदपत्रे ईडीने एसीबीकडून मागवली

By admin | Published: June 5, 2017 04:42 AM2017-06-05T04:42:04+5:302017-06-05T04:42:04+5:30

अंमलबजावणी महासंचालनालयाने (ईडी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) सांगितल्याचे समजते.

ED invites documents from the ACB for the irrigation scandal | सिंचन घोटाळ्याची कागदपत्रे ईडीने एसीबीकडून मागवली

सिंचन घोटाळ्याची कागदपत्रे ईडीने एसीबीकडून मागवली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील सिंचन घोटाळ्याच्या तपासाची कागदपत्रे सादर करण्यास अंमलबजावणी महासंचालनालयाने (ईडी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) सांगितल्याचे समजते. मात्र ईडीकडून याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.
एसीबी तपास करत असलेल्या सिंचन घोटाळ्याचे कनेक्शन भारताबाहेर गेले आहे. काळा पैसा हवालामार्फत परदेशात पाठवल्याचा संशय ईडीला असल्याचे सांगण्यात येते. सिंचनाची कामे देताना राज प्रमोटर्स अ‍ॅण्ड सिव्हिल इंजिनीअर्स प्रा. लि. या कंपनीला झुकते माप दिल्याचा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप आहे. या कंपनीशी अजित पवार यांचे हितसंबंध असल्याचाही आरोप करण्यात आला होता. यासंबंधी एसीबीने चौकशी केली. तब्बल १२ वेळा त्यांना प्रश्नावली पाठवली होती. त्याची उत्तरेही
अजित पवार यांनी वेळोवेळी दिली होती.

Web Title: ED invites documents from the ACB for the irrigation scandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.