माजी मंत्री एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 07:30 AM2021-09-30T07:30:23+5:302021-09-30T07:30:44+5:30

सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मुक्ताईनगर येथे जाऊन समन्स बजाविले. 

ED notice to former minister Eknath Khadse | माजी मंत्री एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस

माजी मंत्री एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस

Next
ठळक मुद्देसक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मुक्ताईनगर येथे जाऊन समन्स बजाविले. 

मुक्ताईनगर (जि. जळगाव) :  भोसरी भूखंड प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मुक्ताईनगर येथे जाऊन समन्स बजाविले. 

बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ईडीचे पथक मुक्ताईनगरातील खडसे यांच्या फार्म हाऊसवर धडकले.  त्यावेळी तिथे कुणीच नसल्याने बाहेर गेटवर हे समन्स डकविण्यात आले. या प्रकारामुळे जिल्ह्यात अनेक चर्चा आणि अफवा पसरल्या होत्या. ईडीकडून नेमके कोणाला समन्स बजावण्यात आले, पथकाच्या कारवाईची कोणतीही माहिती मिळू शकली नाही. 

खडसे हे खासगी कामानिमित्त बाहेरगावी आहेत. फार्महाऊस अथवा कोथळी येथील घरावर कोणत्याही प्रकारची नोटीस  मिळालेली किंवा लावलेली नाही. एवढेच नव्हे तर जप्तीची कारवाई अथवा इतर कोणत्याही चर्चा या केवळ अफवा आहेत.
ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर

Web Title: ED notice to former minister Eknath Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.