‘बारामती ॲग्रो’वर ईडीची छापेमारी; रोहित पवारांची कंपनी, राज्य बँकेशी निगडित प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 06:54 AM2024-01-06T06:54:00+5:302024-01-06T06:54:54+5:30
बारामतीतील कारखान्यासह मुंबई, पुणे, पिंपरी, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या सहा ठिकाणी छापे टाकण्यात आले. यात काय सापडले याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली नाही.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नातू, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर शिखर बॅंक गैरव्यवहारप्रकरणी शुक्रवारी ईडीने छापेमारी केली.
बारामतीतील कारखान्यासह मुंबई, पुणे, पिंपरी, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या सहा ठिकाणी छापे टाकण्यात आले. यात काय सापडले याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली नाही.
कशामुळे छापे?
कन्नड सहकारी साखर कारखाना आजारी झाल्यानंतर त्याचा शिखर बँकेतर्फे लिलाव करण्यात आला. ५० कोटी रुपयांना बारामती ॲग्रोने या कारखान्याची खरेदी केली, असा आरोप आहे. लिलावातील सहभागी बारामती ॲग्रो, हायटेक इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन इंडिया लि. आणि समृद्धी शुगर प्रा. लि. या कंपन्यांमध्ये एकमेकांत झालेले व्यवहार संशयास्पद असल्याचे बोलले जाते.