Anil Deshmukh BREAKING: नागपूरपाठोपाठ अनिल देशमुखांच्या मुंबईतल्या घरी देखील ईडीचा छापा; झाडाझडती सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 09:50 AM2021-06-25T09:50:21+5:302021-06-25T09:50:36+5:30
ED raids former Home Minister Anil Deshmukh house in Nagpur : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबई येथील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) छापा टाकला असून झाडाझडती सुरू आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानापाठोपाठ आता मुंबईतील निवासस्थानी देखील सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) छापा टाकला आहे. देशमुखांच्या दोन्ही निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून झाडाझडती सुरू आहे. सकाळी ८ वाजताच ईडीचे अधिकारी अनिल देशमुख यांच्या घरी दाखल झाले. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार ईडीकडून अनिल देशमुख यांची चौकशी सुरू झाली आहे. याच अंतर्गत हे छापे टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, अनिल देशमुख सध्या नागपूर आणि मुंबईतही नाहीत ते पुण्यात असल्याचं सांगण्यात येत आहे. ED raids former Home Minister Anil Deshmukh house in Nagpur.
अनिल देशमुख प्रकरण : ईडीने जप्त केली महत्त्वाची कागदपत्रे
मुंबईतील वरळी येथे सुखदा टॉवरमध्ये अनिल देशमुख यांचं निवासस्थान आहे. याठिकाणी ईडीचे पाच ते सहा अधिकारी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे अनिल देशमुखांच्या नागपूरातील घराबाहेर सकाळपासूच केंद्रीय पोलीस दलाचे सुरक्षा रक्षक देखील तैनात आहेत. आज सकाळी ईडीचे पाच अधिकारी अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी दाखल झाले. गुरूवारी ईडीकडून पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांची देखील याप्रकरणात चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज ईडीनं अनिल देशमुखांच्या घरावर छापा टाकला आहे. याआधी मे महिन्यात देखील अनिल देशमुखांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. यात महत्वाची कागदपत्रं जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.
PHOTOS: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी ईडीचा छापा, घराबाहेर मोठा बंदोबस्त#AnilDeshmukhpic.twitter.com/bnWzu2WeEM
— Lokmat (@MiLOKMAT) June 25, 2021
सीबीआयकडून ११ तास चौकशी
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (CBI) २१ एप्रिल रोजी अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकून सलग ११ तास चौकशी केली होती. त्यावेळी सीबीआयने अनिल देशमुखांच्या घरातील काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीाआयने गुन्हा दाखल करुन त्यांच्या घरावर छापेही मारण्यात आले होते.