काँग्रेस नेते बाबा सिद्दीकींच्या घरासहीत कार्यालयांवर ईडीचे छापे

By admin | Published: May 31, 2017 01:31 PM2017-05-31T13:31:19+5:302017-05-31T13:50:31+5:30

काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचे मुंबईतील निवासस्थानासहीत विविध कार्यालयांवर ईडीने छापेमारी केली आहे.

ED raids on offices of Congress leader Baba Siddiqui | काँग्रेस नेते बाबा सिद्दीकींच्या घरासहीत कार्यालयांवर ईडीचे छापे

काँग्रेस नेते बाबा सिद्दीकींच्या घरासहीत कार्यालयांवर ईडीचे छापे

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 31 - काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचे मुंबईतील निवासस्थानासहीत विविध कार्यालयांवर ईडीने छापेमारी केली आहे. वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात बाबा सिद्दीकी आणि त्यांचा सहकारी बिल्डर रफीक मकबूल कुरेशी यांचा हात असल्याचा आरोप आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवरच ईडीनं ही कारवाई केली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 6 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. वांद्रे येथील झोपडपट्टी विकासाच्या नावाखाली सुमारे 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप बाबा सिद्दीकी आणि रफीक कुरेशी यांच्यावर आहे. बनावट दस्तऐवज बनवून हा घोटाळा केल्याची माहिती आहे.  
 
ईडीच्या कारवाईमुळे बाबा सिद्दीकी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 

Web Title: ED raids on offices of Congress leader Baba Siddiqui

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.