पंकज भुजबळसह ४३ जणांवर ईडीचे वॉरंट

By admin | Published: April 28, 2016 01:39 AM2016-04-28T01:39:38+5:302016-04-28T01:39:38+5:30

पंकज भुजबळसह ४३ जणांवर विशेष हवाला प्रतिबंधक कायदा न्यायालयाने बुधवारी अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले.

ED warrants for 43 people, including Pankaj Bhujbal | पंकज भुजबळसह ४३ जणांवर ईडीचे वॉरंट

पंकज भुजबळसह ४३ जणांवर ईडीचे वॉरंट

Next

मुंबई : महाराष्ट्र सदन इमारत बांधकाम गैरव्यवहार प्रकरणात पंकज भुजबळसह ४३ जणांवर विशेष हवाला प्रतिबंधक कायदा न्यायालयाने बुधवारी अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले. या गैरव्यवहाराची सक्त वसुली संचालनालय (ईडी) चौकशी करीत आहे.
‘लोकमत’ला ंिंमळालेल्या माहितीनुसार ईडीने दाखल केलेले आरोपपत्र वॉरंटसह आरोपींना बजावले जाऊन त्यांना ११ मे रोजी न्यायालयासमोर हजर राहण्यास सांगितले जाईल. ते हजर न झाल्यास त्यांना अटक होईल. या प्रकरणात ३० मार्च रोजी ५३ जणांवर आरोपपत्र दाखल झाले आहे. आरोपींमध्ये छगन भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज व पुतण्या समीर, राज्यसभेचे सदस्य संजय काकडे, शाहिद बलवा आणि डी.बी. रियल्टीचे विनोद गोयंका यांचा समावेश आहे.
न्यायालयाने आमच्या आरोपपत्राची बुधवारी दखल घेऊन ४४ आरोपींवर अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले. छगन भुजबळ व समीर भुजबळ हे आधीच न्यायालयीन कोठडीत असून इतर सात आरोपी या संस्था असल्यामुळे त्यांना अटकेची गरज नाही, असे ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

Web Title: ED warrants for 43 people, including Pankaj Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.