डी-कंपनीच्या बेनामी मालमत्तेवर ‘ईडी’ची नजर! कासकरवर आतापर्यंत ३ गुन्हे : सराफाकडून दागिन्यांची खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 02:35 AM2017-10-09T02:35:02+5:302017-10-09T02:35:36+5:30

डी-कंपनीच्या बेनामी मालमत्तेची माहिती सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) गोळा केली जात आहे. त्यासाठी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये इक्बाल कासकरची चौकशी करत असलेल्या खंडणीविरोधी पथकाशी ‘ईडी’ने संपर्क साधला आहे.

 ED's eyes on D-Company's benami property! Till now, 3 extortion cases have been registered against Kasker: Jewelry ransom from jewelers | डी-कंपनीच्या बेनामी मालमत्तेवर ‘ईडी’ची नजर! कासकरवर आतापर्यंत ३ गुन्हे : सराफाकडून दागिन्यांची खंडणी

डी-कंपनीच्या बेनामी मालमत्तेवर ‘ईडी’ची नजर! कासकरवर आतापर्यंत ३ गुन्हे : सराफाकडून दागिन्यांची खंडणी

Next

ठाणे : डी-कंपनीच्या बेनामी मालमत्तेची माहिती सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) गोळा केली जात आहे. त्यासाठी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये इक्बाल कासकरची चौकशी करत असलेल्या खंडणीविरोधी पथकाशी ‘ईडी’ने संपर्क साधला आहे.
ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने गेल्या महिन्यात अटक केली. जवळपास तीन आठवड्यांच्या तपासामध्ये पोलिसांनी या प्रकरणी एकूण चार आरोपींना अटक केली. यामध्ये छोटा शकीलचा फायनान्सर पंकज गंगरचाही समावेश आहे. कासकरविरुद्ध आतापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले आहेत. एका प्रकरणात कासकरच्या टोळीने सराफा व्यावसायिकाकडून ५० लाखांचे दागिने खंडणी स्वरूपात घेतले. याशिवाय, गोराई येथील जवळपास २५० कोटी रुपयांच्या जागेच्या वादातही त्याने मोठी खंडणी वसूल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात थेट दाऊद इब्राहिमचे नाव समोर आल्यानंतर ईडीनेही हालचाली सुरू केल्या.
खंडणीच्या पैशांतून डी-कंपनीने जमवलेल्या मालमत्तेचा तपशील गोळा करण्यास सक्तवसुली संचालनालयाने सुरुवात केली आहे. त्यासाठी ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाचीही मदत घेतली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कासकरच्या चौकशीदरम्यान खंडणीविरोधी पथकाने त्याच्याकडून मालमत्तेचाही तपशील काढण्याचा प्रयत्न केला. कासकरचे एकाही बँकेत खाते नसल्याचे चौकशीदरम्यान स्पष्ट झाले. अवैध मार्गाने जमवलेला पैसा कुणी सहसा बँकेत ठेवतच नाही. त्यामुळे पोलिसांनीही त्याच्या या जबाबावर विश्वास ठेवला. मात्र, दाऊद इब्राहिम किंवा त्याच्या भावांनी नातलगांच्या नावे मालमत्ता घेतली असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे त्यांचे हस्तक आणि नातेवाइकांचेही आर्थिक व्यवहार तसेच मालमत्तांचा तपशील सक्तवसुली संचालनालय आणि इतर यंत्रणा घेत आहेत. छोटा शकीलच्या माध्यमातून डी-कंपनीला आर्थिक रसद पुरवणारा मटकाकिंग पंकज गंगर हा या टोळीचा एकमेव फायनान्सर नाही. गंगरसारखे आणखी किती फायनान्सर अर्थपुरवठा करून डी-कंपनीला बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत, याचीही चौकशी केली जात आहे.

Web Title:  ED's eyes on D-Company's benami property! Till now, 3 extortion cases have been registered against Kasker: Jewelry ransom from jewelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.