'गंगाखेड'च्या २५५ कोटींच्या मालमत्तेवर 'ईडी'ची टाच, कृषी कर्ज घोटाळा प्रकरणातील कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 06:41 AM2020-12-24T06:41:36+5:302020-12-24T06:41:53+5:30
Gangakhed assets : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड (जीएसईएल) कंपनीने शेतकऱ्यांच्या नावावर शेतीसाठी कर्ज घेतले होते. त्यासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर ईडीने बुधवारी कारवाई केली.
मुंबई : गरीब शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज घेऊन त्यांची फसवणूक करत मिळालेल्या पैशांतून स्वत:च्या उद्योगांना अर्थपुरवठा करणाऱ्या परभणी जिल्ह्यातील कंपन्यांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी कारवाई करीत २५५ कोटी रुपये मूल्याची मालमत्ता जप्त
केली. कृषी कर्ज घोटाळ्याप्रकरणी
ही कारवाई करण्यात आली
असल्याचे ईडीतर्फे सांगण्यात
आले.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड (जीएसईएल) कंपनीने शेतकऱ्यांच्या नावावर शेतीसाठी कर्ज घेतले होते. त्यासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर ईडीने बुधवारी कारवाई केली.
ईडीने केलेल्या कारवाईमध्ये जीएसईएल कंपनीची २४७ कोटी
रुपये किमतीची यंत्रे, जीएसईएलची पाच कोटी रुपये किमतीची
जमीन, योगेश्वरी हॅचरीज, गंगाखेड सोलार पॉवर लिमिटेडच्या परभणी, बीड आणि धुळे येथील बँकांमध्ये असलेल्या सुमारे दीड कोटी
रुपये किमतीच्या गुंतवणुकी
आणि जीएसईएलच्या १ कोटी
९० लाख रुपये किमतीचे समभाग इत्यादी मालमत्ता जप्त केली
आहे.