बच्चन, शाहरुख, देवगण, जुही यांना ईडीच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 11:25 PM2017-07-22T23:25:58+5:302017-07-22T23:25:58+5:30

चित्रपट कलावंत अमिताभ बच्चन, अजय देवगण तसेच शाहरुख खान तसेच जुही चावला यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) आर्थिक व्यवहारांसंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत.

ED's notices to Bachchan, Shahrukh, Devgan, Juhi | बच्चन, शाहरुख, देवगण, जुही यांना ईडीच्या नोटिसा

बच्चन, शाहरुख, देवगण, जुही यांना ईडीच्या नोटिसा

Next

नवी दिल्ली : चित्रपट कलावंत अमिताभ बच्चन, अजय देवगण तसेच शाहरुख खान तसेच जुही चावला यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) आर्थिक व्यवहारांसंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत.
ईडीने अमिताभ बच्चन व त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाकडून १३ वर्षांत परदेशामध्ये पाठविलेल्या पैशाची माहिती मागितली आहे. अभिनेता अजय देवगण यालाही भारताबाहेर पाठविलेल्या पैशाचा तपशील सादर करण्यास सांगितले आहे.
फेमा कायद्यानुसार तपासणी करण्याआधी ईडीतर्फे नोटीस संबंधितांना बजावली जाते आणि त्यांच्याकडून आवश्यक ती माहिती मागवण्यात येते. अमिताभ बच्चन आणि त्याच्या परिवाराला २00४ नंतर परदेशांमध्ये व्यावसायिक दौऱ्यांत केलेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती देण्यास सांगितले आहे.
शाहरूखला आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सकडून झालेल्या परकीय चलन कायद्याच्या उल्लघंनप्रकरणी यापूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्याला २३ जुलला ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
नाईट रायडर्स स्पोटर््स प्रायव्हेट लिमिटेडचे समभाग मॉरिशसमधील कंपनीला मूळ किंमतीपेक्षा कमी भावात विकण्यात आले. त्यामुळे कंपनीला ७३.६ कोटी रूपयांचा तोटा झाला. याप्रकरणी मार्चमध्ये
ईडीने शाहरूख, पत्नी गौरी खान, अभिनेत्री जुही चावला व अन्य काही जणांना या नुकसानासाठी नोटीस पाठवली होती. कोलकाता नाईट रायडर्सची मालकी नाईट
रायडर्स स्पोटर््स प्रायव्हेट लिमिटेडकडे आहे. (वृत्तसंस्था)

समभाग स्वस्तात
- शाहरुख खाने २००८-०९ मध्ये या कंपनीचे काही समभाग आपल्याच भागीदाराला स्वस्तात विकले. एक समभाग ७० ते ८६ रुपयांना विकायला हवा होता. तो त्याने जय मेहता यांच्या सी आयलंड इन्व्हेस्टमेन्टला दहा रुपयांना विकला. या व्यवहारात अनियमितता असून, समभाग मूल्यांकनाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन झाले असल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

Web Title: ED's notices to Bachchan, Shahrukh, Devgan, Juhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.