'ईडीचा वक्फ बोर्डावर नाही, तर संबंधितांच्या कार्यालयांवर छापा'; नवाब मलिकांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 05:52 PM2021-11-11T17:52:44+5:302021-11-11T17:53:00+5:30

आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत वक्फ बोर्डावरील ईडीच्या छापेमारीवर मोठा खुलासा केला आहे.

'ED's raid on concerned offices, not on Waqf Board'; Explanation of Nawab Malik | 'ईडीचा वक्फ बोर्डावर नाही, तर संबंधितांच्या कार्यालयांवर छापा'; नवाब मलिकांचे स्पष्टीकरण

'ईडीचा वक्फ बोर्डावर नाही, तर संबंधितांच्या कार्यालयांवर छापा'; नवाब मलिकांचे स्पष्टीकरण

googlenewsNext

मुंबई: सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीची पुणे आणि अन्य ठिकाणांवरील वक्फ बोर्डावर छापेमारी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. या छापेमारीचा संबंध अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याशी जोडला जातोय. पण, नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. ईडीची छापेमारी वक्फ बोर्डावर नाही तर बोर्डाशी संबंधित कार्यालयावर सुरू असल्याचं मलिक यांनी सांगितलं. 

वक्फ बोर्डात छापा नाहीच...
पत्रकार परिषदेत मलिक म्हणाले की, वक्फ बोर्डात कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही. छापे बोर्डावर पडले नाहीत, तर वक्फ बोर्डाशी संबंधितांच्या कार्यालयावर पडले आहेत. पुण्यातील एक ट्रस्ट आहे, ताबूत इनाम एंडोमेंट ट्रस्ट, तालुका मुळशी पुणे, हे वक्फ बोर्डाच्या अंतर्गत रजिस्टर आहे. 19 मे, 2005 ला चॅरिटी कमिश्नरकडून वक्फ बोर्डाकडे ट्रान्सफर झाला. डीन रजिस्ट्रेशनने लोकशाही आघाडी सरकार आलं तेव्हा वक्फ अॅक्ट लागू झाला. त्यामुळे चॅरिटी कमिश्नरकडे असलेल्या संस्था त्याचं डीम रजिस्ट्रेशन करण्याचा निर्णय चॅरिटी कमिश्नरने घेतला. आम्ही वक्फ अॅक्ट 1995 आम्ही लागू केला, असं नवाब मलिक म्हणाले. ते पुढे म्हणाले की, काही चॅनलवाल्यांनी सांगितलं की, मलिकच्या घरापर्यंत ईडी येणार आहे. आली तर आम्ही स्वागत करू, मात्र ताबूत इनाम ट्रस्टप्रकरणी छापेमारी होत आहे. त्यात पुण्यात एमआयडीसीत 5 हेक्टर 51 आर जमीन अॅक्विजेशन करुन ऑफिसरकडे पैसे जमा केले. इम्तियाज हुसैन शेख आणि इतर ट्रस्टींनी त्यांना 7 कोटीच्या 76 लाख 98 हजार 250 रुपये ताब्याचे पैसे दिले. मात्र कागदपत्रानुसार 9 कोटी 64 लाख 42 हजार 500 रुपये हे अॅक्विजेशनचे पैसे जिल्हाधिकाऱ्याकडे जमा होते.

तीस हजार संस्थांची चौकशी करावी
वक्फ बोर्डाच्या तीस हजार संस्था आहेत, त्यांची चौकशी करावी अशी मी ईडीला विनंती करेन. आमच्या क्लिनअप अभियानात ईडीचं सहकार्य मिळत आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. लखनऊ शिया वक्फ बोर्डासाठी तिथल्या शिया कम्युनिटीने पंतप्रधानांना पत्रं लिहिलं होतं. सीबीआयकडे प्रकरण दिलं. वसीम रजाच्याही भानगडी आहेत त्याकडेही लक्ष द्या. आम्हाला तुमचं सहकार्य हवं. 30 हजार प्रकरणं देणार आहोत. गेल्या एका महिन्यापासून जे क्लिनअप अभियान सुरू केलं आहे, त्यावरून काहींना वाटत असेल मलिक यांना घाबरवू. तुम्ही सहकार्य देत आहात ही चांगली गोष्ट आहे. कुणाची प्रतिमा मलिन करण्यासाठी ईडीचा वापर होत असेल तर विभागच चुकींचा संदेश जात आहे, असं वाटतं. तुम्ही सहकार्य मागाल तर देऊ, पण आम्ही जी लढाई सुरू केली आहे, चुकीच्या लोकांना आत टाकण्याची लढाई सुरू केली त्यामुळे अशा बातम्या पसरवून मलिकांची प्रतिमा मलिन करता येणार नाही. वक्फ बोर्डात ईडी घुसली म्हणून मलिकांना घाबरवता येणार नाही, असा इशाराही मलिक यांनी यावेळी दिलाय.

वक्फ अॅक्टनुसार बोर्ड काम करण्यास स्वतंत्र आहे

एका बनावट कागदपत्राद्वारे 30 डिसेंबर, 2020 चा दस्ताऐवज वापरुन 7 कोटी 76 लाख 98 हजार 250 रुपये हे त्यांनी आपल्या अकाउंटमध्ये घेतले. त्यानंतर वक्फ बोर्डाला माहिती मिळाल्यानंतर जी एनओसी त्यांनी दाखल केली. जे आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख यांनी पुण्याचे ज्वॉईंट सीईओ खुसरो यांच्या माध्यमातून 13 ऑगस्ट 2021 रोजी पुण्याच्या बंड गार्डनमध्ये एफआयआर दाखल केला. त्यानंतर पाच लोकांना अटक झाली. त्यात चांद रमजान मुलानी, इम्तियाज महम्मद हुसैन शेख, अॅड कलिम सय्यद, राजगुरू आणि कांबळे आदींना अटक करण्यात आली, असंही मलिकांनी सांगितलं. मलिक पुढे म्हणाले की, अल्पसंख्याक पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर वक्फ अॅक्टनुसार बोर्ड काम करण्यास स्वतंत्र आहे. कोणी आमच्याकडे तक्रार केल्यास त्यावर आम्ही चौकशी समिती नेमू शकतो. महाराष्ट्रात पहिल्यांदाच दहा सदस्यांची वक्फ बोर्डावर नियुक्ती केली. निवडणुकीद्वारे दोन जणांचे नाव आले होते. त्यातील एकाची नियुक्ती केली गेली. काही जागा भरायच्या आहेत, पण पहिल्यांदाच फुलफेज बोर्ड बनलं आहे, असंही मलिक यांनी सांगितलं.

Web Title: 'ED's raid on concerned offices, not on Waqf Board'; Explanation of Nawab Malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.