Education: मुंबईत ३४ हजार नागरिक निरक्षर, धक्कादायक आकडेवारी आली समोर

By समीर देशपांडे | Published: June 26, 2023 06:53 AM2023-06-26T06:53:10+5:302023-06-26T06:53:44+5:30

Education: महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत ३४, ३२९ नागरिक निरक्षर आहेत, तर राज्यात सर्वाधिक म्हणजे ६८ हजार ८२० निरक्षर नंदुरबार जिल्ह्यात असून, ठाणे जिल्ह्यात ४० हजार ७९६ निरक्षर आहेत.

Education: 34 thousand citizens are illiterate in Mumbai, shocking statistics have come to light | Education: मुंबईत ३४ हजार नागरिक निरक्षर, धक्कादायक आकडेवारी आली समोर

Education: मुंबईत ३४ हजार नागरिक निरक्षर, धक्कादायक आकडेवारी आली समोर

googlenewsNext

- समीर देशपांडे
एक रुपयाही मानधन न देता राज्यातील सव्वालाख निरक्षरांना साक्षर करण्याचे आव्हान महाराष्ट्रासमोर आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत ३४, ३२९ नागरिक निरक्षर आहेत, तर राज्यात सर्वाधिक म्हणजे ६८ हजार ८२० निरक्षर नंदुरबार जिल्ह्यात असून, ठाणे जिल्ह्यात ४० हजार ७९६ निरक्षर आहेत.

साक्षरतेचे आव्हान मोठे
केंद्राने नव भारत साक्षरता कार्यक्रम' राबविण्याची सूचना सर्व राज्यांना केली असून, त्यानुसार महाराष्ट्रातही काम सुरु झाले आहे. सध्या केवळ सर्वेक्षणाच्या पातळीवरच तयारी सुरु आहे. ३१ मार्च, २०२७ पर्यंत सुमारे सव्वासहा लाख जणांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट आहे.=

निरक्षरतेची कारणे
- कुटुंबातील गरिबी
- रोजगारासाठी स्थलांतर
- पालकांचे छत्र लवकर हरपल्याने दुर्लक्ष
- शैक्षणिक वातावरणाचा अभाव
- शाळा जवळ नसल्याचा परिणाम

जिल्हावार निरक्षरांचे आकडे
लातूर - ११.७६१
मुंबई - ३४,३२९
नागपूर-१४,३२२
अहमदनगर- २०,७०२
नांदेड - १७,४४७
अकोला - ६.२५०
नंदुरबार- ६८.८२०
अमरावती - ९.४१८
नाशिक- २८,२५३
छ. संभाजीनगर - १७,८३७
परभणी- १०,०२५
भंडारा - ४,४२७
पुणे - ३३,३७५
बीड- १४,५८२
रायगड - १०,३७३
बुलढाणा- ११,३२७
रत्नागिरी - ६,३३६
चंद्रपूर- ९,३७४
सांगली - ११.४५८
धुळे - ११.१५४
सातारा - ११,४१४
गडचिरोली - ३७,२००
सिंधुदुर्ग- २,६९१
गोंदिया - ४,८१७
सोलापूर- २१,३०९
हिंगोली- ६.२५०
ठाणे - ४०,७९६
जळगाव - १९,७९०
वर्धा - ५,१२३
जालना -  ११.२८४
वाशिम - ३१,६२०
कोल्हापूर - १५,४५०
यवतमाळ -१२.३२६

Web Title: Education: 34 thousand citizens are illiterate in Mumbai, shocking statistics have come to light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.