भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात शैक्षणिक करार
By admin | Published: September 5, 2014 01:57 AM2014-09-05T01:57:41+5:302014-09-05T01:57:41+5:30
‘न्यू कोलंबो प्लान’ या सामंजस्य करारावर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबट यांनी गुरुवारी स्वाक्ष:या केल्या.
Next
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील विद्याथ्र्याना शिक्षणाच्या संधी निर्माण करून देणा:या ‘न्यू कोलंबो प्लान’ या सामंजस्य करारावर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबट यांनी गुरुवारी स्वाक्ष:या केल्या. या वेळी भारतातील विद्यापीठांनी ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांसोबत शैक्षणिक सामंजस्य करार केले.
मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात गुरुवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात देशातील नामवंत विद्यापीठांनी ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांशी शैक्षणिक सामंजस्य करार केले. यामुळे मुंबई विद्यापीठ व डिकीन विद्यापीठ यांच्यातील सामंजस्य कराराद्वारे विद्याथ्र्याचे शैक्षणिक दौरे, चर्चासत्रे या माध्यमातून देवाण-घेवाण होईल.
सध्या भारतातील सुमारे 30 हजार विद्यार्थी ऑस्ट्रेलियात उच्च शिक्षण घेत आहेत. न्यू कोलंबो प्लानमुळे भारतीय विद्याथ्र्याना आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध होणार असल्याचे, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबट यांनी सांगितले. यापुढेही शैक्षणिक क्षेत्रत भागीदारी केल्यास दोन्ही देशांतील विद्याथ्र्याना शिक्षणाच्या संधी मिळणार आहेत. याचा फायदा शिक्षणाचा दर्जा सुधारण्यात होईल, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)