Education: ३ ते १८ व्या वर्षापर्यंत ४ स्टेजमध्ये शिक्षण, सोप्या भाषेत समजून घ्या नवी शिक्षण प्रणाली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 09:17 PM2023-04-11T21:17:49+5:302023-04-11T21:18:27+5:30

Education News: राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करताना सरकारने शालेय शिक्षणाच्या पूर्ण चौकटीला बदलण्याबाबत विचार स्पष्ट केला होता. त्यामध्ये मुलांना घोकंपट्टी शिक्षणाऐवजी प्रायोगिक ज्ञानाद्वारे शिकवण्याचा विचार मांडण्यात आला होता.

Education: Education in 4 stages from 3rd to 18th year, understand in simple language new education system | Education: ३ ते १८ व्या वर्षापर्यंत ४ स्टेजमध्ये शिक्षण, सोप्या भाषेत समजून घ्या नवी शिक्षण प्रणाली

Education: ३ ते १८ व्या वर्षापर्यंत ४ स्टेजमध्ये शिक्षण, सोप्या भाषेत समजून घ्या नवी शिक्षण प्रणाली

googlenewsNext

राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करताना सरकारने शालेय शिक्षणाच्या पूर्ण चौकटीला बदलण्याबाबत विचार स्पष्ट केला होता. त्यामध्ये मुलांना घोकंपट्टी शिक्षणाऐवजी प्रायोगिक ज्ञानाद्वारे शिकवण्याचा विचार मांडण्यात आला होता. यामध्ये ५+३+३+४ या चौकटीची चर्चा झाली होती. हा वयाच्या तिसऱ्या वर्षापासून ते १८ व्या वर्षापर्यंतच्या वयातील शिक्षणाची चार स्तरीय रचना आहे. एनसीएफच्या गेल्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्री ड्राफ्टमध्ये या चारही स्तरांबाबत सविस्तरपणे माहिती देण्यात आली आहे. सर्वप्रथम जाणून घेऊयात की, ५+३+३+४ हे काय आहे, तसेच संपूर्ण शालेय सिस्टिम या फॉर्म्युल्यावर चालण्यासाठी कशी काय तयारी करत आहे, त्याबाबत.

एनईपी २०२० मध्ये करण्यात आलेल्या शिफारशीनुसार शालेय शिक्षणाची कल्पना एकदम नव्याने केली गेली पाहिजे. त्याला ५+३+३+४ या चार स्तरांच्या डिझाइनमध्ये विभागण्यात आले आहे. त्यात ३ ते १८ पर्यंतच्या वयाचा कव्हर केलं जातं.

५+३+३+४ यामधील ५+३+३+४ या चौकटीमधील ५ मध्ये फाउंडेशनल वर्षांचा समावेश आहे. फाउंडेशन स्टेजला दोन भागांमध्ये वाटण्यात आलं आहे. पहिला अंगणवाडी किंवा प्री स्कूलची तीन वर्षे + प्राथमिक + प्राथमिक शाळेमध्ये २ वर्षे अशा प्रकारे ५+३+३+४ मधील ५चा अर्थ होतो. 

आता ५+३+३+४ मधील पहिल्या ३ बाबत समजून घेऊयात. या पहिल्या तीनमध्ये १-२ ग्रेड दोन्ही एकत्र समाविष्ट आहेत. त्यामध्ये त्यांना ८ वर्षांच्या वयापर्यंत कव्हर केलं जातं. त्यानंतर यानंतरच्या ३ ला इयत्ता तिसरी ते पाचवी च्या तयारीच्या टप्प्यात विभाजित करण्यात आलं आहे. त्यानंतर ३ वर्षे मध्य टप्पा (इयत्ता सहावी ते आठवी) आणि अखेरीच ४ म्हणजे ही माध्यमिक शिक्षणाची ४ वर्षे (इयत्ता नववी ते बारावी) आहेत. अशा प्रकारे तीन ते १८ वर्षांपर्यंत एका विद्यार्थ्याच्या १२वी पर्यंतच्या शिक्षणाचा समावेश आहे.

एनसीएफने दिलेल्या माहितीनुसार प्रीपरेट्री आणि मिडल स्टेजमध्ये दर आठवड्याला दिवसाची सुरुवात ही २५ मिनिटांच्या असेंब्लीसोबत झाली पाहिजे. त्यानंतर प्रत्येक तास हा ४० मिनिटे चालेल. शनिवारी कुठलीही असेंब्ली असणार नाही. तसेच लंच ब्रेक हा ३० मिनिटांचा असेल. 

नववीनंतरही आठवड्यातील दिवसांची सुरुवात ही २५ मिनिटांच्या असेंब्लीसह होईल. मात्र या वर्गांमधील क्लासची वेळ ही ५० मिनिटे असेल. त्यांटा ब्लॉक पीरियड हा मिळून १०० मिनिटांचा असेल. 

या वर्गांमध्ये अॅडिशनल एनरिचमेंट पीरीडयसुद्धा असतील. त्यासाठी शाळेचे दिवस वाढवण्यात आले आहेत. ते विद्यार्थ्यांसाठी करिकुलमच्या कुठल्याही विषयामध्ये एनरिचमेंटसाठी अतिरिक्त वेळेच्या रूपामध्ये उपयोग कऱण्यासाठी असतील.

एनसीएफ ड्राफ्टमध्ये शेवटची ४ वर्षे म्हणजेच ९वी ते १२वीपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांचा आवडता विषय निवडण्याचा पर्याय मिळेल. ते आठ ग्रुपमध्ये विभागले जातील. ह्युमेनिटीज, मॅथामेटिक्स-कॉम्प्युटिंग, व्होकेशनल एज्युकेशन, फिजिकल एज्युकेशन, आर्ट्स एज्युकेशन, सोशल सायन्स, सायन्स, इंटर डिसिप्लिनरी सब्जेक्ट, एक प्रकारे ही चार वर्षे सुद्धा दोन टप्प्यांमध्ये नववी दहावी आणि ११ वी १२वी अशी विभागली जातील. नववी, दहावीमध्ये सायन्स, सोशल सायन्स आणि ह्युमॅनिटिज शिकवले जातील. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये ११वी आणि १२वीमध्ये हिस्ट्री, फिजिक्स भाषा शिकवली जाईल.

११वी आणि १२वीमध्ये ८ सब्जेक्ट्स ग्रुप्समधील ४ सब्जेक्ट्स शिकावे लागतील. या दोन्ही वर्षांमध्ये सेमिस्टर सिस्टिममध्ये शिक्षण होईल. यामध्ये एक सेमिस्टरमध्ये निवडलेला विषय पूर्ण करावा लागेल. अशा प्रकारे पूर्ण क्रमिक पद्धतीने १२वीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना १६ पेपर मध्ये पास व्हावं लागेल. यामधील ८ मधील तीन विषय समुहांमधून आपले चार विषय निवडावे लागेल.  

Web Title: Education: Education in 4 stages from 3rd to 18th year, understand in simple language new education system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.