Maharashtra Election 2019; सत्ताधाºयांकडून खोटा इतिहास पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 03:14 PM2019-10-18T15:14:48+5:302019-10-18T15:20:59+5:30
शरद पवार यांची पंढरपुरात जाहीर सभा; सरकारी यंत्रणांचा विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी वापर
पंढरपूर : इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा धडा सरकारने काढून टाकला. नव्या पिढीला हे काय शिकवणार आहेत? मुलांवर चांगले संस्कार घडविण्याचे काम हे प्राथमिक शिक्षणातून होत असते. सत्तेत बसलेली मंडळी खोटा इतिहास पुढे करतील, अशा प्रवृत्तींना दूर हटवा असे सांगत, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपा-शिवसेना सरकारवर निशाणा साधला.
पंढरपूर येथील येथील शिवाजी चौक येथे आयोजित प्रचार सभेत पवार बोलत होते. आज कोणी सरकारच्या विरोधात आवाज उठवला की त्याला लगेच नोटीस पाठवली जाते. ईडी तसेच इतर यंत्रणांचा वापर हा विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केला जात आहे. धमकी आम्हाला देऊ नका, सत्तेचा वापर हा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी करा, विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी करू नका. असेही शरद पवार म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोलापुरात येऊन विचारत शरद पवारांनी काय केलं, अमित शहा यांना पाच वर्षापूर्वी कोण ओळखत होत का? असा सवाल करून, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारात वारसा पुढे घेऊन जात महाराष्ट्रात शेती-उद्योग, सहकार, शैक्षणिक क्षेत्रात आम्ही काम केले. सर्वसामान्यांच्या हिताची जपणूक केली. स्त्रियांना आरक्षण दिलं, अठरापगड जातींना अधिकार देण्याचे काम केले. भाजपाने गेल्या पाच वर्षात दिलेले कोणतेही आश्वासन पाळत नसल्याचे पवार म्हणाले.
२०० बड्या भांडवलदारांची सुमारे ८१ हजार कोटी थकलेली कर्जाची रक्कम सरकारने माफ केली. बँका वाचवण्यासाठी केल्याचे हे सांगत आहेत. राज्यातील शेतकºयांना सरसकट कर्जमाफी मिळाली नसल्याचे पवार म्हणाले. केंद्रात कृषी मंत्री असताना आपण कांदा उत्पादकांना चार पैसे जादा मिळावेत, यासाठी कांदा निर्यातबंदी उठवली होती. आज शासन थोडा कांद्याचा दर वाढला की निर्यातबंदी लागू करत आहे. सरकारचे हे धोरण शेतकरीविरोधी असल्याचे पवार म्हणाले.