शेतीच्या वादातून इसमास जाळण्याचा प्रयत्न

By admin | Published: June 29, 2016 01:11 AM2016-06-29T01:11:09+5:302016-06-29T01:11:09+5:30

कामरगाव येथील घटना : चौघांवर गुन्हा; दोघांना अटक, दोघे फरार.

Efforts to burn jeans through farming | शेतीच्या वादातून इसमास जाळण्याचा प्रयत्न

शेतीच्या वादातून इसमास जाळण्याचा प्रयत्न

Next

कामरगाव (जि. वाशिम): शेतीसंदर्भातील जुन्या वादातून इसमास जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना २५ जून रोजी घडली असून, याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली; तर इतर दोघे फरार आहेत. ही माहिती कामरगाव पोलिसांकडून २८ जून रोजी प्राप्त झाली.
फिर्यादी नितिन जाखोटिया यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, कामरगावपासून जवळच असलेल्या वापटी-कुपटी येथील विष्णू गणपत निंघोट यांनी आपले कुपटी येथील शेत कारंजा येथील इसमास तीन वर्षापूर्वी विकले. त्या इसमाकडून दोन वर्षांपूर्वी कामरगाव येथील नितीन शंकरलाल जाखोटिया यांनी ते ५ एकर शेत विकत घेतले. मागील वर्षी जाखोटिया यांनी या शेतात सोयाबीनची पेरणी केली. पीक काढणीवर आल्यानंतर या शेतीचे पूर्वीचे मालक विजय विष्णू निंघोट यांनी हार्वेस्टर शेतात घालून नितीन जाखोटीया यांचे सोयाबीन काढून ते चोरुन नेले. जाखोटिया यांनी त्याची फिर्याद धनज पोलीस स्टेशनला दिल्यानंतर याप्रकरणी विजय निंघोट यांच्यावर चोरीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. जाखोटीया यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विष्णू गणपत निंघोट, बेबी विष्णू निंघोट, विजय विष्णू निंघोट, संदीप विष्णू निंघोट या चौघांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी विष्णू निंघोट व बेबी निंघोट यांना २५ जूनच्याच रात्री अटक करण्यात आली; तर विजय आणि संदीप हे दोन आरोपी फरार आहेत.

 

Web Title: Efforts to burn jeans through farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.