गडकरींच्या प्रयत्नाने नागपूरची पाणीपुरवठा योजना रुळावर

By admin | Published: October 25, 2016 04:02 AM2016-10-25T04:02:27+5:302016-10-25T04:02:27+5:30

नागपूर शहराला आठवडाभर २४ तास पिण्याचे पाणी मिळण्यासाठी जवाहरलाल नेहरू अर्बन रिन्युअल मिशनअंतर्गत मंजूर झालेली पाणीपुरवठा योजना प्रलंबित होती. केंद्रीय मंत्री नितीन

With the efforts of Gadkari, Nagpur's water supply scheme was planned | गडकरींच्या प्रयत्नाने नागपूरची पाणीपुरवठा योजना रुळावर

गडकरींच्या प्रयत्नाने नागपूरची पाणीपुरवठा योजना रुळावर

Next

- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
नागपूर शहराला आठवडाभर २४ तास पिण्याचे पाणी मिळण्यासाठी जवाहरलाल नेहरू अर्बन रिन्युअल मिशनअंतर्गत मंजूर झालेली पाणीपुरवठा योजना प्रलंबित होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पाठपुरावा करून, धडक प्रयत्नाद्वारे ती मार्गी लावली.
केंद्र सरकारच्या अमृत योजनेद्वारे २२६ कोटींचा निधी मंजूर केल्याचे शुभ वर्तमान गडकरींनी ‘लोकमत’ला दिले. नागपूरचे पाइपलाइन टाकण्याचे थांबलेले काम आता जलदगतीने पूर्ण होईल. नागपूरच्या ३५00 पेक्षा अधिक अनधिकृत वस्त्या व झोपडपट्ट्यांनाही पाणी पुरवणे शक्य होईल, असे ते म्हणाले. फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी, आॅरेंज सिटी वॉटर डिस्ट्रिब्युशन कंपनी हा प्रकल्प राबवणार असून, याला महापालिकेचे सक्रिय सहकार्य आहे.

Web Title: With the efforts of Gadkari, Nagpur's water supply scheme was planned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.