शिक्षकांच्या सतर्कतेमुळे मुलीचा अपहरणाचा प्रयत्न फसला, सहा मुले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2018 09:00 PM2018-03-01T21:00:29+5:302018-03-01T21:00:29+5:30

शहरातील बदामबाई धनराज गांधी विद्यामंदिर य माध्यमिक शाळेतील मुलीचा सिनेस्टाईल अपहरण करण्याचा प्रयत्न शिक्षकांच्या सतर्कतेने फसला. या प्रकरणी एकूण सहा मुलांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

Efforts of kidnapping of the girl due to teacher alert are in vain, six children are in custody | शिक्षकांच्या सतर्कतेमुळे मुलीचा अपहरणाचा प्रयत्न फसला, सहा मुले ताब्यात

शिक्षकांच्या सतर्कतेमुळे मुलीचा अपहरणाचा प्रयत्न फसला, सहा मुले ताब्यात

Next

नेवासा : शहरातील बदामबाई धनराज गांधी विद्यामंदिर य माध्यमिक शाळेतील मुलीचा सिनेस्टाईल अपहरण करण्याचा प्रयत्न शिक्षकांच्या सतर्कतेने फसला. या प्रकरणी एकूण सहा मुलांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
        या अपहरण नाट्य प्रकरणी कै.सौ. बदामबाई धनराज गांधी विद्या मंदिर या शाळेचे मुख्याध्यापक जनार्धन नामदेव शेंडे (वय ४९) यांनी नेवासा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आमची शाळा पाचवी ते दहावी असून याठिकाणी नेवासा शहर व परिसरातील मुले व मुली शिक्षणासाठी येतात.सध्या शाळेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहे.आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शाळेतील शिक्षक अजय राखमाजी आव्हाड यांनी सांगितले की शाळेमध्ये कोणीतरी मुले आलेली आहेत. शाळेत आलेल्या एका मुलाला बोलावले असता त्याने एका मुलीचे नाव सांगितले व तिची आई आजारी असून मी तिला घेण्यासाठी आलो आहे असे सांगितले.
शिक्षकांनी नाव विचारले असता त्या मुलाने गणेश शिंदे असे नाव सांगितले. मात्र शिक्षकांनी त्या मुलीचा भाऊ असे सांगितले मग आडनाव का एकच नाही यामुळे संशय बळावला.गणेश सोबत आणखी पाच ते सहा मुले होती. गणेश याला शाळेत थांबून ठेवले हे लक्षात येताच इतर मुलांनी तेथून पळ काढला.गणेश याला विविध प्रश्न शाळेतील शिक्षकांनी विचारले असता प्रत्येक उत्तर विसंगतीचे आढळले. 
शाळेतील शिक्षक सर्व श्री नानेकर, बोरुडे व चौधरी यांनी सदर मुलीस बोलावले असता त्या मुलीने गणेश याला ओळखत नसल्याचे सांगितले. तरीही खात्री करण्यासाठी शाळेतील शिपाई आर. व्ही. गरुटे यांनी त्या मुलीच्या घरा शेजारी राहत असलेले चंद्रकांत पंढुरे यांच्याशी संपर्क साधला असता घरी कोणी आजारी नसल्याचे सांगून त्या मुलीला कोणीही घेण्यास पाठविलेले नसल्याचे पंढुरे यांनी सांगितले. 
       सदर मुलाची चांगलीच चौकशी केली असता आम्ही इंडिका क्रमांक एमएच २० एजी ६२३२ या गाडीमधून आलो आहे.आम्ही सदर मुलीचे अपहरण करणार होतो असे सांगितले. लागलीच शिक्षकांनी पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर त्याला पोलिसी खाक्या दाखविताच बरोबर असलेली मुले पळाली असून त्यांचे नावे सांगितली.त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल संदीप दरंदले यांनी सदरची पळून गेलेली मुले नेवासा शहर व परिसरात पकडली. नेवासा पोलिसांनी या प्रकरणी या सर्व मुलांवर नेवासा पोलीस स्टेशनला भा. द. वि. कलम ३६३, ५११, ३४ प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे हे करीत आहे.
     दरम्यान सहा मुले ताब्यात घेतली आहेत त्यातील अल्पवयीन मुले कोण आहेत याचा तपास करण्यात येणार असून अद्याप तरी त्यांची वय सांगता येणार नसून या प्रकरणात वापरलेली इंडिका मात्र जप्त करण्यात आलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Efforts of kidnapping of the girl due to teacher alert are in vain, six children are in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.