कॉल सेंटरप्रकरणी आठ आरोपींना न्यायालयीन कोठडी

By Admin | Published: October 18, 2016 09:03 PM2016-10-18T21:03:23+5:302016-10-18T21:03:23+5:30

मीरा रोड येथील कॉल सेंटरप्रकरणी ५ आॅक्टोबर पासून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास सुरु आहे. याप्रकरणी आतापर्यत ७४ जणांना अटक करून एक कोटीपेक्षा

Eight accused in judicial custody | कॉल सेंटरप्रकरणी आठ आरोपींना न्यायालयीन कोठडी

कॉल सेंटरप्रकरणी आठ आरोपींना न्यायालयीन कोठडी

googlenewsNext

- जितेंद्र कालेकर/ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि.18 - मीरा रोड येथील कॉल सेंटरप्रकरणी ५ आॅक्टोबर पासून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास सुरु आहे. याप्रकरणी आतापर्यत ७४ जणांना अटक करून एक कोटीपेक्षा अधिक मुद्देमाल जप्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती केंद्रीय गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांनीही ठाणे पोलिसांकडून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर आठ आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
कंपनी अ‍ॅक्टप्रमाणे कोणत्याही कॉल सेंटरची नोंदणी न करता सागर ठक्कर उर्फ शॅगी याने त्याच्या काही साथीदारांसह मीरा रोड भागात हे कॉल सेंटर सुरु केले होते. तिथून अनेक अमेरिकन नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारे कॉल करुन आयआरएस (अमेरिकन इंटरनल रेव्हेन्यू सर्व्हिसेस) चे अधिकारी असल्याची बतावणी केली जात होती. त्याद्वारे त्यांनी अनेकांची करोडो रुपयांची फसवणूक केली. युनिव्हर्सल आऊट सोर्सेस सर्व्हिसेस या कॉल सेंटरमधून हैदरअली मन्सूरी, तपेश गुप्ता आणि अर्जून वासूदेव हे संचालक तेथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने परदेशी नागरिकांकडून खंडणी आणि फसवणुकीने पैसे उकळण्याचा ‘उद्योग’ करीत होते.

जगदीश कनानीही मास्टरमार्इंड !
१६ आॅक्टोबर रोजी याप्रकरणी अटक केलेल्या जगदीश कनानी याचीही कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याने कॉलसेंटरमध्ये अनेकांना प्रशिक्षण दिले आहे. त्याचे आणि शॅगीचे जवळचे संबंध असल्याचेही उघड झाले आहे. तोही यातील एक मास्टरमार्इंड आहे. धु्रवेन आणि ब्रिजेश यांनी अहमदाबाद येथून त्याला हवालामार्फत पैसे दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्याचा अलिशान फ्लॅट, महागड्या गाड्यांची खरेदी त्याने कशाप्रकारे आणि कोणत्या पैशांतून केली, याचीही चौकशी आता ठाणे पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, जगदीश हा निष्पाप असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात केला आहे.
दरम्यान, हैदरअली याच्याविरुद्ध नयानगर पोलीस ठाण्यात ५ आॅक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यासह १८ जणांना अटक केली होती. तर काशीमीरा पोलीस ठाण्यात अर्जुन वासूदेव या संचालकासह ५६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक झाली. हैदरअलीला काशीमीरा प्रकरणातही वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांच्या पथकाने पुन्हा अटक केली आहे. तर अर्जुन वासूदेव याला नयानगरच्या प्रकरणात ताबा मिळण्याची मागणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींदद्र दौंडकर यांनी न्यायालयात केली आहे. दरम्यान नवोझ गुप्ता, नासीर घोरी, धर्मेश सोनी,अर्जून वासूदेव, अविनाश मास्टर, गोविंद ठाकूर आणि जॉन्सर डॉन्टीस या आठ जणांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

हवालाचे पैसे घेण्याचे काम
परदेशी नागरिकांची फसवणूक झाल्यानंतर भीतीपोटी ते कॉल सेंटरमधून आलेल्या सूचनांप्रमाणे गिफ्ट कार्ड विकत घ्यायचे. त्याचे पैसे हवालाद्वारे स्विकारण्याचे काम हैदरअली करीत होता, अशी माहिती तपासात उघड झाल्याचे एका वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

 

Web Title: Eight accused in judicial custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.