जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे पात्र

By admin | Published: July 16, 2015 12:04 AM2015-07-16T00:04:21+5:302015-07-16T00:04:21+5:30

जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणी जिल्हास्तरीय समितीची बैठक बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांच्या ...

Eight cases of farmers' suicide are eligible | जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे पात्र

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे पात्र

Next

सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावरील पुणे ते शेंद्रे-सातारा हा रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे आजपर्यंत ३५० पेक्षा जास्त बळी या रस्त्याने घेतले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जणू काही मृत्यूला निमंत्रण दिल्यासारेखच आहे. महामार्गावरील हा प्रवास सातारकरांच्या जिवाला घोर लावणारा ठरत असून जावे त्यांच्या वंशा... या उक्तीप्रमाणे मंत्र्यांनाही याची अनुभूती घ्यावी, यासाठी येथील संकल्प इंजिनिअरिंग सांस्कृतिक सेवाभावी संस्थेने चक्क चार मंत्र्यांच्या नावाने ‘स्वारगेट-सातारा’ या एसटी बसचे आॅनलाईन बुकिंग करून त्यांना तिकीट पाठविले आहे.
संस्थेच्या वतीने निष्कृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाबाबत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीक मांगो आंदोलन करण्यात आले. जीव मुठीत घेऊन प्रवाशांना, वाहनचालकांना पुणे-सातारा हा महामार्गावरील प्रवास करावा लागत आहे. मंत्र्यांनी या मार्गावर एसटी बसने प्रवास केल्याशिवाय त्यांना प्रवाशांच्या व्यथा समजणार नाहीत. यासाठी संस्थेच्या वतीने दि. २ आॅगस्ट या दिवशीचे ‘स्वारगेट ते सातारा’ या प्रवासाचे एसटी बसचे तिकीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री विजय शिवतारे आणि बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावाने काढून त्यांना पाठविण्यात आले आहे. चौघांच्या तिकिटाचे ४२० रूपये आणि आरक्षण शुल्क २० असे एकूण ४४० रुपये संस्थेने अदा केले आहेत.
संस्थेच्या वतीने अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे-बेंगलोर महामार्गावरील पुणे-सातारा या रस्त्याच्या कामाचा ठेका २०१० मध्ये रिलायन्स इन्फ्राला दिला. रिलायन्सने हे काम ३१ मार्च २०१३ पूर्वी पूर्ण करण्याचा करार झाला होता. मात्र, अद्याप २० टक्केही काम झालेले नाही. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रस्तेसुद्धा खूप छान आहेत, इतके निष्कृष्ट काम महामार्गाचे झाले आहे. त्यामुळे आजपर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
याबाबत बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या; पण कार्यवाही झालेली नाही. मोठा अपघात झाला की मंत्री बैठक घेतात; परंतु रिलायन्स इन्फ्रा त्यांना फसवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याकडे लक्ष देऊन उपाययोजना करावी, निकृष्ट रस्त्यामुळे पाचशे-सहाशे लोकांचा जीव गेला, याला जबाबदार म्हणून रिलायन्स व ‘न्हाय’वर गुन्हा दाखल करण्याची सूचना राज्य सरकारला करावी, अशा आशयाचे पत्र संस्थेने पंतप्रधानांना पाठविले आहे. (प्रतिनिधी)

जिल्ह्याला रिलायन्समुक्त करा
संकल्प इंजिनिअरिंग सांस्कृतिक सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिलायन्सच्या निकृष्ट कामाला कंटाळून भीक मांगो आंदोलन केले व जमा झालेल्या पैशातून रिलायन्स इन्फ्राच्या नावानं केक कापून निषेध व्यक्त केला. तसेच महामार्गाच्या निकृ्ष्ट कामाची कॅसेट पाठवून आम्हाला रिलायन्समधून मुक्त करा, असे पत्र पंतप्रधानांना पाठविण्यात आले आहे.

सातारा तुमची वाट पाहतोय...
लोकसभा निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी कोल्हापूर, सांगलीला आले होते. त्यावेळी त्यांनी ‘सांगली करू चांगली’ असे मराठीतून सांगितले होते. परंतु सातारला नाही आलात. सातारा जिल्हा तसा लहानच. शुद्ध हवा, निसर्गसौंदर्य, शिवछत्रपतींची गादी, थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर, डौलात उभा असेलेला प्रतापगड तसेच यशवंतराव चव्हाण यांचे गाव याच जिल्ह्यातले. माजी पंतप्रधान, माजी मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातले... असा हा छोटा पण भारी आमचा सातारा पाहायला तुम्ही यावे, अशा आशयाचे पत्र संस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले आहे.
 

Web Title: Eight cases of farmers' suicide are eligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.