आठ दिवसांत मागण्यांची पूर्तता न केल्यास मंत्रालयात घुसू, अंगणवाडी सेविका आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 05:19 PM2017-09-27T17:19:28+5:302017-09-27T17:20:16+5:30

आठ दिवसांत मागण्यांची पूर्तता न केल्यास मंत्रालयात घुसू, असा इशारा आज आझाद मैदानात अंगणवाडी सेविकांनी दिला आहे. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासमोर अंगणवाडी सेविकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

In eight days, if the demands are not met, then Ghusu in the Ministry, and the Anganwadi Sevika Agrawak | आठ दिवसांत मागण्यांची पूर्तता न केल्यास मंत्रालयात घुसू, अंगणवाडी सेविका आक्रमक

आठ दिवसांत मागण्यांची पूर्तता न केल्यास मंत्रालयात घुसू, अंगणवाडी सेविका आक्रमक

Next

मुंबई, दि. 27 - आठ दिवसांत मागण्यांची पूर्तता न केल्यास मंत्रालयात घुसू, असा इशारा आज आझाद मैदानात अंगणवाडी सेविकांनी दिला आहे. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासमोर अंगणवाडी सेविकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अंगणवाडीसेविकांचं पगारवाढीसह इतर मागण्यांसाठी सध्या मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. या अंगणवाडी सेविकांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे आले असता अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या मागण्यांसाठी घोषणाबाजी केली. यावेळी उद्धव ठाकरेंनीही सरकारवर जोरदार टीका केली.

ज्या मातांचे आशीर्वाद घ्यायला पाहिजे, त्या मातांचे सरकारला शाप लागल्याशिवाय राहणार नाही, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, मी इथे नेतृत्त्व करायला नाही, तर नेतृत्वाला ताकद द्यायला आलो आहे. तुम्ही आई बनून कुपोषित बालकांचं पालन पोषण करता. ज्या मातांचे आशीर्वाद घ्यायला पाहिजे, त्या मातांचे शाप लागल्याशिवाय राहणार नाही. खचून जाऊ नका, सरकारला नमवण्याची ताकद तुमच्यात आहे. अंगणवाडीसेविका ज्या दिशा ठरवतील त्यामध्ये शिवसेना सहभागी असेल, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. आमची मनं अजून जिवंत आहेत. मुर्दाड मनाने आम्ही कारभार करू शकत नाही. मुख्यमंत्रीसाहेब इकडे प्रतिष्ठेचा प्रश्न करू नका, इकडे लाडू द्या नाहीतर चिक्की द्या. लोकशाहीच्या नावाने जर तुम्ही ठोकशाही करणार असाल, तर हे मी चालू देणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

मी नेतृत्व करायला नाही तर नेतृत्वाला ताकद द्यायला आलो. माता भगिनींची झोप उडवून तुम्ही तुमची स्वप्न साकारायला दौरे करतात
वेडा झालेला विकास राज्याला आणि देशाला परवडेल का, निवडणूक आल्यानंतर तुम्हाला शिवरायाची आठवण येते. त्या शिवाजी महाराज्यांच्या या माता भगिनींचे शाप तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही, ही लोकशाहीच्या मार्गाने ठोकशाही चालली असेल तर ती आम्ही मोडून काढू, तुमची ताकत सरकारला नमवू शकते, इतिहासाची पुनरावृत्ती घडवायची इच्छा त्यांची असेल तर ती पुनरावृत्ती घडवायची तयारी माझी आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती आंदोलनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची हजेरी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी केली. 

Web Title: In eight days, if the demands are not met, then Ghusu in the Ministry, and the Anganwadi Sevika Agrawak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.