विदर्भात धग कायमच आणखी आठ बळी

By admin | Published: June 10, 2014 01:10 AM2014-06-10T01:10:48+5:302014-06-10T01:10:48+5:30

विदर्भात गेल्या चार दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. कडक उन्हाच्या तडाख्यात उष्माघाताने विदर्भात आणखी आठ जणांचा बळी घेतला आहे. यात अमरावती जिल्ह्यातील तीन, वर्धा आणि गोंदिया जिल्ह्यात

Eight of the eight victims in Vidarbha | विदर्भात धग कायमच आणखी आठ बळी

विदर्भात धग कायमच आणखी आठ बळी

Next

नागपूर : विदर्भात गेल्या चार दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे.  कडक उन्हाच्या तडाख्यात उष्माघाताने  विदर्भात आणखी आठ जणांचा बळी  घेतला आहे. यात अमरावती जिल्ह्यातील तीन, वर्धा आणि गोंदिया जिल्ह्यात प्रत्येकी दोन तर चंद्रपूर जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे.
अमरावती जिल्ह्यात वरुड तालुक्यात दोघांचा तर एकाचा बडनेरा येथे मृत्यू झाला. हातुर्णा येथील बहिणाबाई विश्‍वनाथ बंड (६७) या राहत्या घरी  मृतावस्थेत आढळून आल्या तर धनोडी मार्गावरील रामदेव बाबा लॉनजवळ एक अनोळखी इसम मृतावस्थेत आढळला. या मृतदेहाची अद्यापही  ओळख पटली नाही.
चंद्रपूर जिल्ह्यातील पेंढरी कोके येथील वनिता सोनबाजी नान्हे (४७) हिचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली. वनिता मागील दोन दिवसांपासून  घरून बेपत्ता होती. दरम्यान, रविवारी रात्री तिचा मृतदेह मच्छी सहकारी संस्थेच्या कार्यालय परिसरात असलेल्या समाजमंदिराजवळ आढळून आला.
वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील दिलीप भाऊराव क्षीरसागर (५0) नामक इसमाचा मृतदेह सोमवारी सकाळी यशोदा नदीच्या बाजूला असलेल्या मंदिर  परिसरात आढळून आला.
दिलीप वेडसर असल्यामुळे तो दिवसभर उन्हातान्हात भटकंती करुन तसेच कुणालाही जेवण मागून मंदिर परिसरात राहत होता. उन्हाच्या  तडाख्यातसुद्धा त्याचे वास्तव्य  उघड्यावरच होते. यामध्येच त्याचा अन्नपाण्याशिवाय उष्माघाताने बळी घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दुसर्‍या घटनेत रविवारी यवतमाळ मार्गावर नजीकच्या भिडीपासून  दीड किमी अंतरावर राजेश रहागंडाले (४0) रा. सोनेगाव ता. कळंब याचा मृतदेह  रस्त्याच्या कडेला आढळून आला. राजेश हा कळंबवरून देवळीकडे एसटी बसने येत होता. तिकीटचे पैसे नसल्यामुळे त्याला शिरपूर फाट्याजवळ बस  वाहकाने उतरवून दिले. त्यामुळे तो पायदळ अनवानी चालत असताना चक्कर येऊन खाली पडला व त्याचा उष्माघाताने मृत्यू झाला. गोंदिया जिल्ह्यात  र्ईी येथील पृथ्वीराज बाबुलाल तरोणे (३२) या इसमाचा उष्माघाताने मृत्यू झाला. दुसर्‍या घटनेत देवरी ग्रामपंचायत अंतर्गत वॉर्ड क्र. ६ (परसटोला)  येथील आनंदाबाई बुधाजी मडावी (७0) यांची प्रकृती रविवारी सायंकाळी ६ वाजता उष्माघातामुळे बिघडली. रात्री ९ वाजताच्या सुमारास राहत्या  घरीच त्यांचा मृत्यू झाला.
 

Web Title: Eight of the eight victims in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.